ISRO Update
भारताचे आदित्य L1 मिशन सूर्याकडे झेपावले आहे. चांद्रयान 3 नंतर हे दुसरे यान इस्त्रोने अवकाशात सोडले आहे. आज (दि.2) सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. या यानाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्रात नागरिकांनी गर्दी केली होती.
आदित्य L1 ला सूर्याजवळ जाण्यासाठी 125 दिवस लागणार आहेत. यान सूर्याचा संपूर्ण अभ्यास करणार आहे. त्यामुळे आपल्याला माहित नसलेली सूर्याची माहिती मिळणे शक्य होणार आहे. इस्रोच्या (ISRO) या मोहिमेमुळे सूर्याची नवनवीन माहिती समोर येणार आहे. तसंच सूर्याचा अधिकचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.
आदित्य यान विविध पाच टप्प्यात प्रवास करणार असून तिसऱ्या टप्पानंतर हे सूर्याकडचा प्रवास करणार आहे. चौथ्या टप्प्यात हे यान लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल.
इस्रोने आदित्य एल 1 लॉन्च केल्याने सूर्याचा अभ्यास करणं शक्य आहे. स्पेस स्टेशनमधून हे यान यशस्वीरित्या अंतराळात झेपावलं आहे. लॉन्चिंग झाल्यानंतर 125 दिवसांनी हे यान एल-1 पॉइंटपर्यंत पोहोचेल. त्यानंतर आदित्य एल 1 हे तिथून महत्त्वाचा डेटा पाठवणार आहे.
दरम्यान, चांद्रयान 3 ची मोहिम भारताने यशस्वी रित्या पार पाडल्यानंतर आज दुसरी मोहिम अवकाशात झेपावली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा भारताला नवा इतिहास रचण्याची संधी मिळाली आहे. सौर मिशनमधून केवळ भारतालाच नव्हे तर जगाला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे.
Published on: 02 September 2023, 02:15 IST