जगात मिरची उत्पादनाच्या दृष्टीने भारत हा देश महत्वाचा मानला जातो कारण भारतात सर्वात जास्त मिरची चे पीक घेतले जाते. जरी शेतकरी वर्गाची यामध्ये प्रामुख्याने भूमिका असली तरी संशोधन वर्गाची सुद्धा तेवढीच महत्वाची भूमिका आहे. वातावरणात होणारे सतत बदल त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते मात्र सरकार यामध्ये कोणतीही भूमिका घेत नाही. तेलंगणा मध्ये सुद्धा असेच काहीसे झाले आहे जे की ९ लाख एकर मिरची क्षेत्रावर त्रिप रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने तिथे मोठे नुकसान झाले आहे तरी सुद्धा तेलंगणा सरकारने यामध्ये कोणताही मार्ग काढला नाही ना कोणती भूमिका घेतली आहे. पीक संरक्षण साठी जो निधी मंजूर करण्यात आला होता त्यापैकी ८८.०९ टक्के निधी फक्त खर्च केला आहे.
शेतकऱ्यांचा सरकारवर काय आहे आरोप?
मिरचीच्या उत्पादन बाबतीत तेलंगणा मधील शेतकरी सर्वात अग्रेसर आहेत मात्र या पिकाचे किडीपासून संरक्षण व्हावे म्हणून सरकार कोणतेच प्रयत्न करत नाही असे शेतकरी नेते अजय वडियार यांनी सांगितले. याव्यतिरिक्त जे बनावट बुरशीनाशक आहेत त्यावर सुद्धा बंदी घातली नाही. कृषीतज्ञ बिनोद आनंद यांनी सांगितले की किडीवर आळा घालण्यासाठी ज्या एजन्सी आहेत त्या योग्य प्रकारे काम करत नाहीत. या घाळ कारभारामुळे यंदाच्या वर्षी सुमारे ५ हजार कोटी रुपयांचे मिरचीचे नुकसान झाले आहे.
मिरची उत्पादक क्षेत्र अन् उत्पादकता :-
भारतामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, आसाम, मध्य प्रदेश ही राज्ये मिरचीचे प्रामुख्याने उत्पादन घेतात अशी माहिती मसाला बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. २०२०-२१ च्या वर्षी भारतात २० लाख ९२ हजार टन मिरचीचे उत्पादन झाले. २००१ - २००२ मध्ये भारतात केवळ १ हजार २१५ किलो मिरचीचे उत्पादन निघाले होते. २०२०-२०२१ मध्ये जवळपास ८४२९.७५ कोटी रुपयांची मिरची ची निर्यात झालेली आहे. भारत देश प्रामुख्याने श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, चीन, अमेरिका, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती, इंग्लंड आणि बांगलादेश ला मिरची निर्यात करते.
काय आहेत आव्हाने?
१. संकरित जातींची रोगविरोधी कमी उपलब्धता.
२. बनावट रसायनांचा वापर.
३. मिरचीचे उत्पादन घेतेवेळी शेतकरी वर्गाला आधुनिक कृषी उपक्रमे जे आहेत त्यांची माहिती नसते.
४. मिरची फोडल्यानंतर त्यास कसे कोरडे करणे व सुरक्षित कसे ठेवणे हे शेतकऱ्यांना माहीत नाही.
मिरचीचे किती प्रकार :-
जगात मिरचीचे प्रकार जवळपास ४०० आहेत जे की मिरचीचा रंग, आकार आणि तिखटपणा यावर आधारित आहेत. त्यामध्ये एकट्या भारत देशात ५० पेक्षा जास्त मिरचीच्या जाती आहेत. २०१८ मध्ये जागतिक बाजारपेठेत भारताचा मिरची बाबत ५० टक्के तर चीन चा फक्त १९ टक्के वाटा आहे.
Published on: 20 January 2022, 02:10 IST