भारतीय कृषी क्षेत्रात हरित क्रांती झाल्यानंतर भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. आपल्या देशाची गरज भागवून इतर देशांना निर्यातीच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवण्याची क्षमता भारतात आहे.
सगळ्या प्रकारच्या अन्नधान्याच्या बाबतीत भारताची स्थिती अगदी उत्तम आहे. त्याचेच प्रत्यंतर सध्या येत आहे. सध्या रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे या देशातून इतर देशांना होणाऱ्या अन्नधान्य तसेच इतर विविध प्रकारच्या निर्याती प्रभावित झाले आहेत.
नक्की वाचा:अरे वा! महानंद राबवेल रियल पेमेंट सिस्टीम; शेतकऱ्यांच्या खात्यात येणार थेट दुधाचे पैसे
आता पण हीच गोष्ट जर गहू याबद्दल पाहिले तर ईजिप्त या देशाला रशिया आणि युक्रेन मधून मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात केली जाते. परंतु तेथील युद्धजन्य परिस्थिती मुळे गव्हाच्या उत्पादनात घट तर आधीच परंतु निर्यात देखील प्रभावित झाली आहे.
ही पोकळी आता भारताने भरून काढण्याचे ठरवले असून प्रत्यक्षात भारताने इजिप्तला गव्हाची निर्यात केली आहे. आतापर्यंत इजिप्त या देशाला गव्हाचे निर्यात करणाऱ्या मान्यताप्राप्त देशांच्या यादीत भारताने स्थान मिळवले आहे. जर आपण इजिप्तला होणाऱ्या गव्हाचा पुरवठा चा विचार केला तर रशिया आणि युक्रेन मधून जवळजवळ 80 टक्के गहू निर्यात होतो. परंतु या दोन देशातील उत्पादनच घटल्यामुळे भारताकडे गव्हाची मागणी वाढू लागल्याने या वाढत्या मागणीचा फायदा यावर्षी गहू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच हवामान बदलाचा परिणाम देखील बऱ्याच देशांमध्ये झाला असून गव्हाच्या उत्पादनात घट आली आहे.
परंतु या तुलनेमध्ये भारतातील पंजाब, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये गव्हाचे उत्पन्न सरासरी इतके झाली असून या राज्यातून अधिक निर्यात होणार आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताने यावर्षी जास्तीत जास्त गव्हाच्या निर्यातीचे लक्ष्य समोर ठेवले असून यामध्ये इजिप्त या देशाला 30 लाख टन गव्हाची निर्यात करण्याचे उद्दिष्ट असल्याचे अपेडा चे अध्यक्ष एम. अंगामुथु यांनी सांगितले आहे. त्यामुळे या निर्यातीमध्ये असलेल्या मोठ्या संधीचा फायदा देशाला मिळणार असून पर्यायाने गहू उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात होईल यात शंकाच नाही.
Published on: 18 April 2022, 10:00 IST