News

नेमके खरीप हंगाम असो की रब्बी हंगाम जेव्हा पिकांना खते द्यायची वेळ येते तेव्हाच नेमकी खतांची टंचाई भासते. त्यातल्या त्यात पोट्याश युक्त खतांची टंचाई तर पाचवीलाच पुजलेले असते.

Updated on 25 March, 2022 8:25 PM IST

 नेमके खरीप हंगाम असो की  रब्बी हंगाम जेव्हा पिकांना खते द्यायची वेळ येते तेव्हाच नेमकी खतांची टंचाई भासते. त्यातल्या त्यात पोट्याश युक्त खतांची टंचाई तर पाचवीलाच पुजलेले असते.

या समस्येवर उपाय म्हणून आणि सगळ्यात महत्वाचे कारण रशिया आणि युक्रेनमध्ये जे काही युद्ध सुरू आहे या युद्धाचा परिणामामुळे रशिया आणि बेलारुस मधून होणारी खतांची निर्यात थांबली आहे. त्यामुळे सरकारने इतर देशांकडूनम्हणजेच कॅनडा, इस्राईल आणि जॉर्डन यासारख्या देशांकडून पोटॅश आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच युरियाच्या  बाबतीत मर्यादित वापराचे धोरण राबवून युरियाचा वापर पाच टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

नक्की वाचा:शेतकरी दादांनो! जलद कंपोस्ट खत तयार करायचे आहे तर वापरा हे तंत्रज्ञान; खत होईल पटकन तयार

 याबाबतीत रासायनिक खत मंत्री मनसुख मंडाविया काय म्हणाले?

 जर भारताला खतांचा पुरवठा करणाऱ्या देशांचा विचार केला तर यामध्ये रशिया आणि बेलारूसया देशाचा प्रामुख्याने समावेश होतो. मात्र रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू झाल्यानेखतांच्या पुरवठ्याचे गणित बदलले.रशिया मार्गे होणारी खतांचीवाहतूक थांबलीव त्यामुळे निर्यात ठप्प झाली.

आपल्याकडे रब्बी हंगाम तर आता संपल्यात जमा आहे परंतु येणाऱ्या खरीप हंगामासाठीखतांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासेल. त्यामुळे खते वेळेवर मिळण्यासाठी इतर देशांकडून आयात करण्याचे ठरवले आहे. त्यासोबतच त्यांनी सांगितले की खरीप हंगामासाठी खताचे चिंता होती मात्रखतांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे असे ते म्हणाले. खरीप

वाचा:किडींच्या विरोधात परफेक्ट बॅटिंग करतात कामगंध सापळे, पिकांना ठेवतात कीडमुक्

साधारण तीनशे लाख टन खताची गरज असते. सरकारने या सगळ्या मध्येखतांची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे देखील मंडविया यांनी सांगितले.

या परिस्थितीत भारत इतर देशांकडून पोटॅश  आयात वाढणार असून कॅनडा, जॉर्डन आणि इस्राईल या देशांकडून आयात केले जाणार आहे. यामध्ये बारा लाख टन पोटॅश कॅनडा कडून तर सहा लाख टन इस्रायलकडून तरतीन लाख टन पोटॅश जॉर्डन या देशाकडून आयात होणार आहे असे जाणकारांनी सांगितले.

 युरियाचा वापर होणार कमी

 सरकारने देशातील युरीयाचा वापर कमी करण्याचे ठरवले आहे कारण युरियाची कमी आयात आणि वापरावर मर्यादेमुळे वापरही कमी होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. सरकारने आता युरियाचा वापर पाच टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले.  परंतु होते असे की युरिया वर अनुदान असल्याने तो स्वस्त मिळतो. स्वस्त मिळाल्याने त्याचा वापर देखील वाढतो. त्यामुळे युरिया वरील अनुदान बंद करावी अशी सूचना काही जणांनी केली होती. 

परंतु युरिया स्वस्त मिळाला नाही तर त्याचा वापर देखील कमी होऊ शकतो परिणामी पिकांची उपलब्धता कमी होईल.  सध्या युरियाची बॅग 266 रुपये आहे. यूरिया वरील अनुदान जर काढून घेतले तर हीच बॅग एक हजार ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान पडते.त्यामुळे खातावर चे अनुदान सुरू ठेवावे असे सरकारच्या एका समितीने यामध्ये म्हटले आहे.

English Summary: india export potash fertilizer from jardan canada and israiel
Published on: 25 March 2022, 08:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)