Maharashtra Politics News
विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीची आज (दि. ३१) आणि उद्या (१ सप्टेंबर) मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये मिटींग पार पडत आहे. या बैठकील देशातील विविध २८ पक्षांचे नेते एकत्र येत आहेत. पाटणा, बंगळुरुनंतर I.N.D.I.A आघाडीची ही तिसरी बैठक आहे. पाटणा, बंगळुर नंतरआता मुंबईमध्ये २ दिवसांच्या बैठकीच आयोजन करण्यात आले आहे.
बैठकीत आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र कसे असेल याचबरोबर समन्वय समितीसंदर्भात सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच I.N.D.I.A आघाडीच्या लोगोचं अनावरणही या बैठकीनंतर केलं जाईल किंवा त्यावर शिक्कामोर्बत होईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मुंबईतील दोन दिवसीय बैठकीला २८ पक्षांचे एकूण ६३ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याआधी बंगळुरू येथे पार पडलेल्या बैठकीला एकूण २६ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Published on: 31 August 2023, 11:04 IST