Agriculture Export News : मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या, ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या संदर्भात कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने आकडेवारी जाहीर केली आहे. यात कृषी निर्यातीत वाढ होत असल्याच नमूद करण्यात आलं आहे.
कृषी आकडेवारीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात कृषी निर्यातीत US$ 26.7 बिलियनची वाढ नोंदवण्यात आली आहे. निर्यातीचा हा आकडा वाढवण्यात 200 हून अधिक देशांनी भाग घेतला. हे 12 टक्के प्रशसनीय चक्रवाढ वार्षिक वाढ दर (CGAR) दर्शवते. 1987-88 मध्ये कृषी निर्यात 0.6 यूएस डॉलर होती. त्याच वेळी भारताची कृषी निर्यात 2022-23 या कालावधीत US$ 53.1 बिलियनवर पोहोचली आहे. भारताच्या कृषी निर्यातीत अपेडाचे योगदान 51 टक्के होते.
अपेडाच्या निर्यात गटातील 23 प्रमुख वस्तूंपैकी 18 ने एप्रिल-डिसेंबर 2023 या कालावधीत सकारात्मक वाढ दर्शविली. विशेषत: 15 प्रमुख वस्तूंपैकी 13 ज्यांची निर्यात गेल्या वर्षी US$ 100 दशलक्षपेक्षा जास्त होती. याशिवाय प्रक्रिया केलेल्या भाजीपाल्याची निर्यात या काळात 24 टक्क्यांनी वाढली आहे. यानंतर विविध प्रक्रिया केलेल्या वस्तू, बासमती तांदूळ आणि ताज्या भाज्यांच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. भारताने प्रामुख्याने ताज्या फळांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ केली आहे. गेल्या वर्षी 102 देशांच्या तुलनेत आज ते 111 देशांना आपली सेवा देत आहे.
दरम्यान एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत बासमती तांदळाचे निर्यात मूल्य गेल्या वर्षीच्या US$3.33 अब्जच्या तुलनेत 19 टक्क्यांनी वाढून US$3.97 अब्ज झाले आहे. यासह निर्यातीच्या प्रमाणात 11 टक्के लक्षणीय वाढ दिसून आली. जी त्याच कालावधीत 31.98 लाख मेट्रिक टनांवरून 35.43 लाख मेट्रिक टन झाली.
Published on: 20 February 2024, 02:38 IST