Independence Day 2022: देशात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. आज 15 ऑगस्ट 2022, यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
आगामी 25 वर्षांसाठी पंतप्रधानांनी 'पंचप्रण' (Panch Pran) कार्यक्रम देखील देशासमोर ठेवला आहे. येत्या काळात आपण 'पंचप्रण'वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. हे 'पंचप्रण' खालीलप्रमाणे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'पंचप्रण'
1. विकसित भारत : पहिलं प्रण म्हणजे विकसित भारताचं. आता देश एक मोठा संकल्प घेऊन चालेल आणि तो मोठा संकल्प विकसित भारताचा आहे.
2. गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका : दुसरं प्रण म्हणजे आपल्या मनाच्या कोणत्याही कोपऱ्यात गुलामगिरीचा एकही अंश राहू देऊ नका. या गुलामगिरीच्या सर्व खुणा पुसून टाका.
3. आपल्या वारशाचा अभिमान बाळगा : तिसरे प्रण म्हणजे आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. हाच वारसा आहे, ज्याने भारताला सुवर्णकाळ दिला. याच वारशामध्ये वेळोवेळी परिवर्तन करण्याची ताकद आहे.
4. एकतेचं सामर्थ्य : चौथं प्रण म्हणजे एकता आणि एकजुटता. 130 कोटी देशवासियांमध्ये एकता असावी, आपला आणि परका असा भेद नसावा. एक भारत आणि श्रेष्ठ भारताची ही प्रतिज्ञा आहे.
5. नागरिकांची कर्तव्ये : पाचवं प्रण हे नागरिकांचे कर्तव्य आहे. यात पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचाही समावेश आहे. 25 वर्षांचे संकल्प पूर्ण करण्याचं आमचं हे व्रत आहेत.
Independence Day 2022 : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
आठ ते दहा हजार लोकांची उपस्थिती
ध्वजारोहणाच्या वेळी लाल किल्ल्यावर सुमारे 250 प्रतिष्ठित व्यक्तींशिवाय सुमारे 8,000-10,000 लोकांची उपस्थिती होती. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ गेल्या ७५ आठवड्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत लोक 'हर घर तिरंगा' मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आहेत.
Published on: 15 August 2022, 10:34 IST