1. बातम्या

‘ड्रॅगन फ्रूट’कडे शेतकऱ्यांचा वाढला कल, कृषी विभाग देणार अनुदान

ड्रॅगन फ्रूट’ला यंदापासून प्रथमच अनुदान देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. हेक्टरी १ लाख ६० हजार रुपये अनुदान मिळत असून अनेक शेतक ऱ्यांनी ‘ड्रॅगन फ्रूट’ची लागवड करून शेतीत नवी वाट चोखळण्याचा मार्ग निवडला आहे. पैठण तालुक्यासह इतरही काही भागांत लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
‘ड्रॅगन फ्रूट’

‘ड्रॅगन फ्रूट’

ड्रॅगन फ्रूट’ला यंदापासून प्रथमच अनुदान देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. हेक्टरी १ लाख ६० हजार रुपये अनुदान मिळत असून अनेक शेतक ऱ्यांनी ‘ड्रॅगन फ्रूट’ची लागवड करून शेतीत नवी वाट चोखळण्याचा मार्ग निवडला आहे. पैठण तालुक्यासह इतरही काही भागांत लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.

औरंगाबाद, पुणे, मुंबईसह परराज्यातून आणि मॉलसारख्या बहुवस्तू विक्रीच्या व्यावसायिक ठिकाणांमधूनही ‘ड्रॅगन फ्रूट’ला मागणी असून दरही ७० ते ९० रुपये किलोपर्यंत मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. औरंगाबाद जिल्ह्य़ातील पैठण तालुक्यातील लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.वडवळी, पिंपळवाडी आदी परिसरांतील अनेक गावांमधील शंभर एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर ‘ड्रॅगन फ्रूट’ची लागवड होत आहे.

हेक्टरी १ लाख ६० हजारांचे अनुदान

‘ड्रॅगन फ्रूट’ला यंदापासून प्रथमच अनुदान देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. हेक्टरी १ लाख ६० हजार रुपये अनुदान मिळत असून अनेक शेतक ऱ्यांनी ‘ड्रॅगन फ्रूट’ची लागवड करून शेतीत नवी वाट चोखळण्याचा मार्ग निवडला आहे. पैठण तालुक्यासह इतरही काही भागांत लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबईसह परराज्यातून आणि मॉलसारख्या बहुवस्तू विक्रीच्या व्यावसायिक ठिकाणांमधूनही ‘ड्रॅगन फ्रूट’ला मागणी असून दरही ७० ते ९० रुपये किलोपर्यंत मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. औरंगाबाद जिल्ह्य़ातील पैठण तालुक्यातील लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.

 

वडवळी, पिंपळवाडी आदी परिसरांतील अनेक गावांमधील शंभर एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर ‘ड्रॅगन फ्रूट’ची लागवड होत आहे. साधारण बरी आर्थिक परिस्थिती असलेले शेतकरी या फळाची लागवडीसाठी निवड करत आहेत. वर्षभरात काही अंशी हातात येणारे हे पीक तीन वर्षांनंतरपासून घसघशीत उत्पन्न पदरी टाकणारे आहे, असे लागवड केलेल्या शेतक ऱ्यांचे मत आहे. आवरणी भागात गुलाबी, मगज पिवळा किंवा पांढरा, असे काही प्रकार फळामध्ये आढळून येतात. विविध आजारांमध्येही हे फळ आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असल्याचा दावाही शेतकरी करतात.

हेही वाचा : उष्णकटिबंध भागात पण येईल ड्रगन फ्रुटचं उत्पादन; शेतकर्‍यांसाठी फायद्याचे शेती

पैठणपासून १० किलोमीटर अंतरावर शेत असलेले आणि प्रत्यक्ष लागवड केलेले श्याम काळे यांनी सांगितले की, यंदापासून हेक्टरी १ लाख ६० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळतील. आम्ही सुरुवातीला गुजरातमधून काडय़ा विकत आणल्या. गुजरातमध्ये मोठय़ा क्षेत्रावर ‘ड्रॅगन फ्रूट’ची लागवड केलेली आढळते. एका एकरमध्ये ३५० पोल लावून त्याच्या बाजूने ४ ते ५ रोपे लावली जातात. यातून २५ ते ३० किलोचा माल निघतो. साधारण एकरी अडीच लाख रुपये लागवडीचा खर्च आहे. रोपेही करून विकता येतात. यंदा आम्ही ४० ते ५० रुपयांना एक रोप विक्री केले. औरंगाबाद, पुणे, मुंबई महानगरासह परराज्यातून आणि विशेषत: मॉलमधूनही ड्रॅगनला मागणी असते.

 

आरोग्यासंबंधीचे वादे

‘ड्रॅगन फ्रूट’पासून काही आरोग्याशी संबंधितही फायदे असल्याचे दावे केले जातात. त्यामध्ये जीवनसत्त्व अ आणि ब व खनिजे, तसेच कॅल्शिअम अधिक प्रमाणात आढळतात. चेतासंस्थेसाठी लाभदायक असून डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. डागरहित त्वचेसाठीही हितकारक असल्याचे सांगण्यात येते. जखमाही लवकर भरून येतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हे फळ आहे. पचनसंस्था सुधारणारे असून अधिक प्रमाणात फायबर असल्याने बद्धकोष्टतेसारखा विकारही दूर करणारे आहे.

‘ड्रॅगन फ्रूट’ला यंदापासून हेक्टरी १ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पैठण तालुक्यातील वडवळी, पिंपळवाडी या दोन गावांमध्ये लागवड झाली आहे. इतरही ठिकाणांहून प्रस्ताव येत आहेत.

– विशाल साळवे, कृषी मंडळ अधिकारी, पैठण

प्रतिनिधि गोपाल उगले‘

English Summary: Increased tendency of farmers towards 'Dragon Fruit', Department of Agriculture will provide subsidy Published on: 27 August 2021, 10:34 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters