काळाच्या ओघात पीक पद्धतीमध्ये बदल व्हावा असे केंद्र सरकार तसेच राज्य सरकारचे मत आहे तसेच पाण्याचा अवाढव्य वापर होऊ नये म्हणून यासाठी ठिबक सिंचन वापरण्यास सांगितले जे की त्यास अनुदान सुद्धा दिले आहे. ठिबक सिंचनाचा मोठ्या प्रमाणात वापर व्हावा यासाठी अनुदानाची रक्कम ८० टक्केवर केलेली आहे जे की मागील दोन महिन्यांपूर्वी च राज्य सरकारने याबाबत घोषणा तर केली होतीच मात्र आता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी सुद्धा उपलब्ध झाला आहे असे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे सांगत आहेत.
असे असणार अनुदानाचे स्वरुप :-
राज्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत जे शेतकरी सूक्ष्म सिंचन बसवणार आहेत त्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के अनुदानव्यतिरिक्त २५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान भेटत आहे या अनुदान व्यतिरिक्त ३० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने जे शेतकरी सूक्ष्म सिंचन बसविणार आहेत त्यांच्यासाठी ७५ - ८० टक्के अनुदान मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या खर्चात होणार बचत :-
२०२१-२२ या वर्षात जे शेतकरी सूक्ष्म सिंचन बसवणार आहेत त्यांना अनुदान दिले जाणार असल्याचे राज्य सरकारने मंजूर केले आहे. जे की ७५-८० टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचणार आहे. राज्यात जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये सूक्ष्म सिंचन बसविण्यात मदत होईल असे कृषिमंत्री दादा भुसे सांगतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे दादा भुसे यांनी आवाहान केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज :-
१. सर्वात प्रथम तुम्हाला महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल ओपन करायचे आहे नंतर तुम्हाला तिथे अर्ज करा असा टॅग दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर सिंचन साधने सुविधा यावर क्लिक करून समोरील बाबी निवडा या वर क्लिक करावे, त्यामध्ये जिल्हा, तालुका, गाव व तुमची वैयक्तिक माहिती भरावी.
२. यानंतर कोणत्या पीकाला सिंचन करायचे आहे त्याची माहिती भरावी तसेच यानंतर पूर्व समंती घेतल्याशिवाय मी या योजनेचा लाभ घेणार नाही अशी नोंद करावी. सर्व भरलेली माहिती चेक करून सेव्ह करावी. नंतर मुख्य मेनू वर जाऊन ऑप्शन वर क्लिक करावे त्यानंतर अर्ज सादर करावा यावर कळेल करावे. त्यानंतर तुम्हाला तालुका हा ऑप्शन दिसेल जे की तुम्ही ज्यादातही अर्ज केला आहे त्या योजनेचे नाव दवखील तिथे येईल.
३. हे सर्व झाल्यानंतर त्यांच्या अटी व शर्ती मान्य कराव्या तसेच मी अर्ज सादर करावा लागणार आहे. सर्व प्रक्रिया पार पडली की तुमच्या अकाउंट २३ रुपये आणि ६० पैसे कट होतील.
Published on: 08 January 2022, 02:45 IST