News

मराठवाडा नाव ऐकले की सर्वात आधी आठवते तो भयान दुष्काळ! पण अलीकडे मराठवाड्यात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत, त्या धक्कादायक घटना म्हणजे बळीराजाच्या आत्महत्या. आणि मराठवाड्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या चे प्रमाण एक विशेष चिंतेचा विषय बनत आहे. बदलत्या काळानुसार शेतीच्या क्षेत्रात अनेक मूलभूत बदल बघायला मिळाले, असेच बदल मराठवाड्यात देखील बघायला मिळाले, या बदलांमुळे पिकातून चांगले उत्पादन तर मिळायला लागले, पण सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा पूर्ण हैराण झाला आहे. निसर्गाच्या अशाच अवकृपेचा सामना बीड जिल्ह्यातील शेतकरी देखील करत आहे. या चालू वर्षामध्ये बीड जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेच उदाहरण समोर आल आहे. बदलत्या हवामानामुळे बीड जिल्ह्यात उत्पादनात कमालीची घट बघायला मिळाली आहे, त्यामुळे शेतकरी राजा पूर्ण निराष झाला आहे, म्हणूनच बीड जिल्ह्यात यावर्षी जवळपास 193 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Updated on 22 December, 2021 12:02 PM IST

सरकार दावा करते की शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे, शेतकरी आता सुजलाम-सुफलाम बनत आहे, राज्यातील शेती आता आधुनिक झाली आहे, पण या सर्व गोष्टी फक्त कागदावरच आहेत की काय आता असा प्रश्न सामान्य माणूस उभा करीत आहे, कारण की जमिनीवरची स्थिती ही खूपच भीतीदायक आणि धक्कादायक बघायला मिळत आहे, सरकार जर आपल्या दाव्यामध्येच गुंग असेल तर त्यांनी एकदा या आकडेवारीवर व्यवस्थित लक्ष घालावे, मग कदाचित मायबाप सरकारची डोळे उघडतील. कारण की ही स्थिती फक्त बीड जिल्ह्यातच आहे असे नाही तर मराठवाड्यात गेल्या 11 महिन्यात तब्बल 805 शेतकऱ्यांनी आपल आयुष्य संपवले आहे. जर खरंच शेतकरी राजा सुखी असता, सुजलाम सुफलाम असता, जर खरंच त्याचे उत्पन्न दुपटीने वाढले असते तर शेतकरी राजाने आपले सोन्यासारखे आयुष्य का संपवले असते? हा सरळ आणि सोपा प्रश्न आता शेतकरी शासनदरबारी उभा करू पाहत आहे.

ते दोन काळे महिने

राज्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले संपूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला यासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना त्यातून निघाला नाही. खरीप हंगामात झालेले नुकसान शेतकरी राजा पचवू शकला नाही, याच कारणामुळे एकट्या बीड जिल्ह्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन काळ्या महिन्यात तब्बल 52 शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपविले. या दोन काळ्या महिन्यात अनेक शेतकरी कुटुंबे उघड्यावर आले आहेत, या कुटुंबाचा कर्ता पुरुष घरात नसल्याने त्यांचा संसार कसा चालणार असा प्रश्न आता उभा राहिला आहे.

नेमकी शेतकरी आत्महत्या वाढण्यामागे कारणे आहेत तरी काय

जगाचे पालन पोषण करणारा शेतकरी आपले स्वतःचे पालन-पोषण करू शकत नाहीये हे भयाण वास्तव बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. सरकार दावा करते की शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे कारण की शेतीमध्ये आमूलाग्र बदल हा घडताना दिसत आहे. मात्र या सर्व गोष्टी फक्त ऐकायलाच बऱ्या वाटतात वास्तविक यापेक्षा काही औरच आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि आपल्या सोन्यासारख्या शेतमालाला बाजार भाव मिळत नाही या कारणावरून जगाचा पोशिंदा आपले आयुष्य संपविताना दिसत आहे. शेतकरी राजा उत्पादन वाढीसाठी अनेक प्रयत्न करतो उत्पादनवाढीसाठी तो वेळेप्रसंगी सावकारी कर्ज देखील घेतो पण निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि त्याच्या मालाला बाजार भाव मिळत नसल्याने त्याच्या उत्पन्नात घट होते आणि परिणामी तो घेतलेले कर्ज देखील फेडू शकत नाही या विवचनेतून तो आपले आयुष्य संपवतो. एकंदरीत आसमानी आणि सुलतानी या दोन संकटांमुळे जगाचा मालक, बळीराजा अर्थात शेतकरी राजा आपले सोन्यासारखे आयुष्य संपवितो. आता शेतकरी राजा असा प्रश्न उभा करता झाला आहे की, बळीचे राज्य खरच येणार आहे की बळीच संपणार आहे.

English Summary: increased rate of farmer suicide in maharashtra,the highest cases in marathwada
Published on: 22 December 2021, 12:02 IST