News

नवी दिल्ली: "साखरेच्या किमान विक्री दरात (मिनिमम सेलिंग प्राईस) वाढ करण्यात यावी व घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या साखरेचे विक्री दर वेगवेगळे असावेत" अशी सूचना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केली आहे.

Updated on 27 February, 2020 11:26 AM IST


नवी दिल्ली:
"साखरेच्या किमान विक्री दरात (मिनिमम सेलिंग प्राईस) वाढ करण्यात यावी व घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या साखरेचे विक्री दर वेगवेगळे असावेत" अशी सूचना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केली आहे. साखरेच्या वापरावर जागतिक स्तरावर घट होत असून ती दोन टक्क्यावरून थेट अर्ध्या टक्क्यावर आली आहे याकडे लक्ष्य वेधून राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले की जरी जगातील लोकसंख्या वाढत आहे तरी साखरेचा खाण्यासाठी होणारा वापर मात्र कमी होत आहे यामागे जागतिक साखर विरोधी मोहीम कार्यरत आहे.

या शिवाय जगातील तीस देशांनी साखर मिश्रित उत्पादनांवर वेगवेगळे कर ही आकारले आहेत. एकीकडे "ट्रिम", " स्लिम", "जिम" याकडे तरुण आकर्षित होत आहेत तर दुसरीकडे मिठाई, चॉकलेट्स, बिस्किटे, शीतपेये यातील साखरेचा वापर कमी होत चालला आहे. परिणामस्वरूप बाजारातील साखरेची मागणीही कमी होत आहे. आणि याचा फटका साखर उद्योगाला बसत असल्याचे श्री. नाईकनवरे यांनी सांगितले. चर्चासत्रातील आपल्या प्रमुख सादरीकरणाद्वारे श्री. नाईकनवरे यांनी असेही विशद केले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धसदृश्य वातावरण असल्याने त्याचे परिणाम क्रूड ऑइलच्या पुरवठ्यावर व किमतीवर आणि त्याचा प्रतिकूल परिणाम भारतातील व भारताबाहेरील इथेनॉलच्या प्रकल्पांवर होण्याची भीती आहे.

त्यांनी पुढे असेही सांगितले की कारखाना परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर इथेनॉल मिश्रणाची परवानगी दिल्यास वाहतुकीवरील खर्चात बचत होऊ शकेल. देशातील १९ राज्यांतील पाच कोटी शेतकरी ५१ लाख हेक्टर क्षेत्रात ऊसाचे पीक घेतात व त्यातून वर्षागणिक चार हजार लाख टन उसाचे उत्पादन होते. परंतु बदलत्या हवामानात, कमी पाण्यात, कमी दिवसात व जास्त उत्पादन देणारे ऊसाचे वाण अजून तयार झाले नाही. शिवाय खोडवा व्यवस्थापन हे क्षेत्र सातत्याने दुर्लक्षित राहिले आहे. आणि ऊसाच्या दोन पट्ट्यात मिश्र पीक घेण्याच्या तंत्रातही आपण मागे आहोत अशी आव्हाने साखर उद्योगसमोर उभी ठाकली आहेत, असे श्री. नाईकनवरे यांनी विशद केले.

संपूर्ण देशात ऊसाची किंमत सामान असावी यावर आग्रही भूमिका घेऊन श्री. नाईकनवरे यांनी साखर उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी वाफे मध्ये तीस टक्के बचत, ऊर्जेत २५ किलो वॅटची बचत करण्यासाठी कारखान्यातील यंत्र सामुग्री अद्ययावत असावी, असे सांगितले. साखर कारखान्यांनी जागतिक दर्जाच्या साखरेचे उत्पादन करावे असे सुचवून त्यांनी साखरेचे धोरण ठरविण्याऱ्यांनी (पॉलिसी मेकर्स) एस, एम व एल ग्रेड साखरेच्या किमान विक्री किमतीतील भिन्नता राखावी असे सांगितले. त्याच प्रमाणे साखरेची सध्याची किमान विक्री किंमत ठरविताना वित्त आणि घसारा किंमतही लक्षात घ्यावी कर आणि साखरेच्या एक्स मिल किमतीत व घाऊक किमतीत किलो मागे सात रुपयाचा फरक आहे, याकडे श्री. नाईकनवरे यांनी लक्ष वेधले.

English Summary: Increase the minimum selling price of sugar
Published on: 27 February 2020, 11:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)