शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसाय देखील शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळून देते नाही. त्यामुळे अनेक शेतकरी संघटना दुधाला अधिक दर मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत. तर राज्यातील काही भागात हरितक्रांती प्रमाणे धवलक्रांती व्हावी म्हणून शेती अभ्यासकांकडून प्रयत्न केले जात आहे. दुग्ध व्यवसायातील गुंतवणूक, समस्या आणि मिळणार दर हा कसा योग्य नाही हे अनेकवेळा या लोकांकडून पटवून देण्यात आले आहे.
असे असताना मात्र शेतकऱ्यांना दुधाला खरीददारांकडून योग्य दर मिळत नाही. परंतू बटर आणि पनीर या पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेऊन दुधाच्या खरेदीत ३ रुपये दरवाढ करण्यात आली आहे. कात्रज डेअरी येथे दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून तो सुखावला आहे.
याचबरोबर विक्री किंमत देखील २ रुपयांनी वाढली आहे. तर यातील तफावत असलेला एक रुपया व्यवसायीक सोसणार आहेत. कोरोना काळापासून वाढत्या महागाईने शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय अधिकच अडचणीत येऊ लागला आहे. शिवाय पुशखाद्य, जनावरांची देखभाल खर्च वाढल्याने दुधाला मिळणार दर शेतकऱ्यांना परवडत नाही. यात ही झालेली दरवाढ शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे. तर याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कात्रज डेअरीकडून देण्यात आली आहे.
शिवाय या बैठकीला महानंद, चितळे, गोवर्धन, गोविंद, ऊर्जा, शिवामृत, कात्रज, राजहंस, स्फुर्ती, सोनाई, शिवप्रसाद, नेचर डिलाईट, रिअल डेअरी, एस. आर. थोरात, अनंत, संतकृपा, सुयोग इत्यादी सहकारी व खाजगी दूधव्यावसायिकांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते.मात्र अनेक शेतकऱ्यांकडून दुधाला देखील सरकारकडून एफआरपी मिळावा अशी मागणी होत आहे. यापूर्वी अनेकवेळा शेतकऱ्यांना दुधावर अनुदान देखील देण्याचा प्रयत्न झाला. मात्र हे अनुदान देखील अल्पायुष्य ठरल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.
दरवाढीसाठी अनेकवेळा शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध सांडून निषेध केला आहे. गाय व म्हशीच्या दुधाचा उत्पादन खर्च काढण्यासाठी अकोला, राहुरी, परभणी आणि दापोली कृषी विद्यापीठांना व एका खाजगी संस्थेला निर्देश देण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. दुग्ध क्षेत्राकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी हा जोडधंदा नुकसानीपोटी बंद केला आहे. त्यामुळे मागील महिन्यात दूध संकलनात लक्षणीय घट झाल्यामुळे दूध संघांचे धाबे दणाणले आहे.
पेट्रोल पॅटर्नप्रमाणे दूध संघाने ग्राहकांच्या दूध खरेदी दरात हळूहळू वाढ करून शहरी मानसिकता बदलावी अशी मी मागणी केली होती. त्याची सर्वच दूध संघ अंमलबजावणी करीत आहे, त्याबद्दल आनंद आहे. पण शेतकऱ्यांनी फक्त 2~3 रुपयांच्या विक्री दरवाढीने हुरळून जाऊ नये. कारण दुधाच्या उत्पादन खर्चानुसार गाईच्या दुधाला किमान 43 रुपये प्रति लिटर मिळणे आवश्यक आहे. असे फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स अध्यक्ष सतीश देशमुख यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या;
काय सांगता! शेतकऱ्याने वासराचे धुमधडाक्यात घातलं बारसं! बारशाला जमलं आख्ख गाव..
शेतकऱ्यांना दिलासा! आता दूध व्यवसाय परवडेल, दुधाच्या दरात सरसकट लिटरमागे 3 रुपयांची वाढ
होळीच्या दिवशी शेतकऱ्यांना कर्जमाफीची खास भेट, 34,788 शेतकऱ्यांना होणार लाभ
Published on: 16 March 2022, 12:44 IST