News

गेल्या महिन्यात सर्वच पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव हे कोसळले होते. तसेच भाव नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो आणि भाजीपाला हा रस्त्यावर च फेकून दिला आणि जनावरांना सुद्धा चरायला ठेवला. त्यामुळं यातून शेतकरी वर्गाला मोठा तोटा झाला होता.निसर्गाच्या कोपाचा सर्वात मोठा परिणाम हा पिकांवर होत असतो. कारण त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान आणि हानी सुद्धा झाली आहे. गेल्या महिन्यात तर टोमॅटो ची तोडणी करणे सुद्धा कठीण झाले होते.

Updated on 16 October, 2021 1:53 PM IST

गेल्या महिन्यात सर्वच पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव हे कोसळले होते. तसेच भाव नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी  टोमॅटो (tomato) आणि  भाजीपाला  हा रस्त्यावर च फेकून दिला आणि जनावरांना सुद्धा चरायला ठेवला. त्यामुळं यातून  शेतकरी  वर्गाला मोठा तोटा  झाला होता.निसर्गाच्या  कोपाचा सर्वात मोठा परिणाम हा पिकांवर  होत असतो. कारण त्यामुळे  मोठया प्रमाणात नुकसान आणि हानी सुद्धा झाली आहे. गेल्या महिन्यात तर टोमॅटो ची तोडणी करणे सुद्धा कठीण झाले होते.

ऐन सणासुदीच्या काळात टोमॅटो चे भाव चांगलेच वाढले:

भाव नसल्यामुळे टोमॅटो राणातच सडून गेला होता. कारण  त्यातून तोडणीचा पैसा  सुद्धा  मिळत न्हवता त्यामुळे रानात सर्वत्र टोमॅटो चा लाल चिखल झाला होता. परंतु त्याच टोमॅटो ने आज बाजारभावात आभाळभर उंची गाठली आहे. सध्या बाजारात टोमॅटो ला 50  रुपये प्रति  किलो ते  80 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात  टोमॅटोचे भाव चांगलेच वाढले आहेत. भाव वाढल्यामुळे आता गरिबांच्या आहारातून टोमॅटो हा गायबच झालेला आहे.मंडई मध्ये टोमॅटो ला 80 रुपये प्रति किलो पर्यँत भाव मिळाला आहे. तसेच ठोक बाजारात टोमॅटो च्या एका कॅरेट चा भाव हा 1100 रुपये झालेला आहे. म्हणजेच ठोक बाजारात टोमॅटो हा 50 ते 55 रुपये या भावाने मिळत आहे तसेच हाच टोमॅटो बाजारात आणि मंडई मध्ये गेल्यावर 80 रुपये प्रति किलो या भावाने विकला जात आहे.

टोमॅटो चे भाव वाढल्याने शेतकरी सुखावला आहे. गेल्या  महिन्यात शेतकरी पूर्णपणे बुडाला होता त्यातून तो आता उभारी घेत आहे. आणि  सर्वात महत्वाचे म्हणजे ऐन सणासुदीच्या  काळात टोमॅटो चे भाव वाढल्याने मध्यम वर्गीय लोकांच्या आहारातून टोमॅटो बाजूला निघाला आहे. तसेच पावसामुळे टोमॅटो चा पुरवठा सुद्धा कमी प्रमाणात होत असल्याने भावात सतत  तेजी  दिसत आहे. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी टोमाटो चे उत्पादन सुद्धा घटले आहे त्यामुळे बाजारात टोमॅटो चे भाव हे दिवाळी पर्यँत वाढतच राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रोगराई चा अति प्रभाव:-

टोमॅटो हे पीक कमी कालावधीत येणारे पीक आहे त्यामुळे या पिकावर रोगराई चा जास्त प्रभाव असतो. त्यामुळं बऱ्याच वेळी संपुर्ण पीक हे रोगराई मुळे जाते.सध्या सुद्धा रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्न सुद्धा कमी मिळाले आहे. त्यामुळे टोमॅटो चे भाव मोठया प्रमाणात वाढलेले आहेत. यावर सर्वात जास्त कारणीभूत ही रोगराई आहे.

टोमॅटो लागवड खर्च:-

टोमॅटोची लागवड करण्यासाठी सरासरी खर्च हा एकरी एक लाख रुपये एवढा येतो.परंतु वाढत्या महागाई मुळे हाच लागवडी चा खर्च डबल वाढला आहे.मागच्या साली एक एकरामध्ये कमीत कमी 50 कॅरेट टोमॅटो चे उत्पन्न मिळाले होते.परंतु यंदा च्या वर्षी पावसामुळे आणि वाढत्या रोगराई मुळे टोमॅटो चे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे त्यामुळं बाजारात टोमॅटोची कमी निर्माण होत आहे. त्यामुळे टोमॅटो चे भाव हे गगनाला भिडले आहेत. त्यामुळं नैसर्गिक आपत्ती मुळे उत्पन्न घटल्यामुळे भाव वाढत चालले आहेत.

English Summary: Increase in the price of ‘red mud’ tomatoes in the field, know the market price
Published on: 16 October 2021, 01:52 IST