News

जसे जसे ऊसाचे गाळप वाढत आहे तसे दुसरीकडे ऊसाला आगीच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अधिकतर घटना ह्या शॉर्टसर्किटमुळे झाल्या असल्याचे समोर आले आहे. अहमदनगरला पाथर्डी येथे शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून सुमारे ३०

Updated on 11 February, 2022 4:30 PM IST

जसे जसे ऊसाचे गाळप वाढत आहे तसे दुसरीकडे ऊसाला आगीच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अधिकतर घटना ह्या शॉर्टसर्किटमुळे झाल्या असल्याचे समोर आले आहे.

अहमदनगरला पाथर्डी येथे शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून सुमारे ३० एकर ऊस जाळून नुकसान झाले आहे. तनपुरेवाडी येथील ऊसाच्या शेतातील ऊसतोडणी सुरू असताना शॉर्टसर्किट मुळे आग लागली. मजुरांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठी असल्याने त्यांनी देखील यश आलं नाही. या आगीने तनपुरेवाडी येथील शेजारी शेजारी असलेल्या १० शेतकऱ्यांच्या शेतातील उसाने पेट घेतला आणि मोठं नुकसान केलं आहे.

शेतशिवारातूनच विद्युत वाहिन्या ह्या गेलेल्या आहेत. वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण होते आणि एका ठिणगीने जो वणवा पेटतो यामध्ये शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. महावितरणकडून वेळीच दुरुस्तीची कामे होत नसल्याने घटना वाढत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. तर अशा शार्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागत आहे.

सध्या ऊस अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ऊसाचे पाचरटही वाळलेले आहे. एकदा ठिणगी पडली की, वाळलेल्या पाचरटामुळे अवघ्या काही वेळातच होत्याचे नव्हते होत आहे. पाथर्डी येथील घटनेमध्ये तर १० शेतकऱ्यांचा ऊस आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. तनपुरेवाडी येथील ऊसाच्या शेतातील ऊसतोडणी सुरू असताना शॉर्टसर्किट मुळे आग लागली. मजुरांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठी असल्याने कामगारांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला होता. पाथर्डी नगर परिषदच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटना स्थळी पोहचल्या. 

परंतू त्यांना देखील आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे तीन तास लागले. तो पर्यंत जवळपास ३० एकर वरील ऊस जाळला. या आगीत १० शेतकऱ्यांच्या उसाचे मोठं नुकसान झालं असून सरकारने पंचनामे करून मदत द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

English Summary: Increase in sugarcane fire incidents in the state; Burn 30 acres of sugarcane again
Published on: 11 February 2022, 04:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)