News

बहुतांशी शेतकरी दरवर्षी आडसाली उसाच्या लागवडी करतात. असे असताना ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीवर भर दिला. यामुळे ऊस लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे.

Updated on 04 May, 2023 1:08 PM IST

बहुतांशी शेतकरी दरवर्षी आडसाली उसाच्या लागवडी करतात. असे असताना ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीवर भर दिला. यामुळे ऊस लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे.

त्यामुळे पुढील गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होणार आहे. पुणे विभागात आडसाली, पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा उसाचे सरासरी तीन लाख ४३ हजार ३९२ हेक्टर क्षेत्र आहे.

आतापर्यंत चार लाख १३ हजार १५० हेक्टरवर ऊस लागवडी झाल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांनी एक लाख ६९ हजार हेक्टर खोडवा उसाचे क्षेत्र राखले असल्याचे चित्र असून, सरासरीच्या तुलनेत ऊस क्षेत्रात ६९ हजार ७५८ हेक्टरने वाढ झाली आहे.

पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार, ही 2 महत्त्वाची कामे लवकर उरका

दरम्यान, गेल्यावर्षी १३ जानेवारी अखेरपर्यत एक लाख ८६ हजार ५४० हेक्टरवर लागवडी झाल्या होत्या. यंदा आडसाली उसाच्या एक लाख २० हजार ८० हेक्टर, पूर्वहंगामी ७८ हजार ५७३ हेक्टर, सुरू ४४ हजार ५३४ हेक्टर आणि खोडवा उसाच्या एक लाख ६९ हजार ९६३ हेक्टरवर लागवड झाली आहे.

यामध्ये अहमदनगर आणि पुणे जिल्हात मोठ्या प्रमाणावर लागवडी झाल्या आहेत. यामध्ये श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या आहेत.

राष्ट्रवादीचं ठरलं! शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष होणार? कर्नाटक दौरा अचानक रद्द..

तसेच दौंड, शिरूर, इंदापूर, जुन्नर, हवेली, बारामती या तालुक्यांतही लागवडी झाल्या आहेत. यामुळे आता कारखाना आणि साखर आयुक्त कशा प्रकारे नियोजन करणार हे येणाऱ्या काळात समजेल.

मनरेगा सिंचन योजनेतील शेतकऱ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार ४ लाखांचे अनुदान
पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार, ही 2 महत्त्वाची कामे लवकर उरका
हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहिल्यास तुरुंगवास आणि 5000 रुपयांचा दंड, राज्यात नवीन नियम..

English Summary: Increase in sugarcane area by 70 thousand hectares, big lead in Pune division..
Published on: 04 May 2023, 01:08 IST