Milk Rate: काही दिवसांत दिवाळी सणाला सुरूवात होत आहे. त्यातच म्हशीच्या आणि गाईच्या दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. तसंच म्हशीच्या दूध विक्री दरातही वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारपासून नव्या दूध दरवाढीची अंमलबजावणी केली जाईल.
असे आहेत नवे दर
नव्या दरांप्रमाणे आता म्हशीच्या दूध खरेदी करताना प्रति लिटर 2 रुपये मोजावे लागणार आहेत. तर गाईच्या दूध खरेदी करताना प्रति लिटर 3 रुपये मोजावे लागणार आहे.
दरवाढीनंतर आता म्हशीला प्रति लिटर 47.50 पैसे तर गाईला प्रति लिटर 35 रुपये दर मिळणार आहे. गेल्या दीड वर्षात 9 रुपयांची दूध दरवाढ नोंदवण्यात आली आहे. आतापर्यंत सहा वेळा दूध खरेदी-विक्री दरात वाढ करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! कांद्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचे बाजारभाव..
शहरांत अशी असेल गोकुळ दुधाची किंमत
म्हशीच्या दूध विक्री दरातही 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आधी म्हशीच्या एक लिटर दुधाचा दर कोल्हापूरमध्ये 60 रुपये होता. तो आता 63 रुपये इतका झाला आहे.
तर अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 30 रुपयांवरुन 32 रुपये इतकी झाली आहे. तर मुंबई, पुण्यात एक लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 66 रुपयांवरुन आता 69 रुपये झाली आहे.
आता सरकारकडून फळबागांची लागवड करण्यासाठी तब्बल 100 टक्के अनुदान; असा घ्या लाभ
तर अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 33 रुपयांवर 35 रुपये इतकी झाली आहे. 6.0 फॅट आणि 9.0 एसएनएफ प्रतिलिटर 45.50 पैसे इतका खरेदी दर म्हशीच्या दुधाला आधी मिळत होता.
तो आता 47.50 झाला असून गायीच्या दूधाचा खरेदी दर 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ प्रतिलीटर 32 वरुन 35 रुपये इतका झाला आहे. 21 ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत.
इफको-एमसी क्रॉप सायन्स हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; जाणून घ्या फायदे..
Published on: 18 October 2022, 01:35 IST