News

संत्रावरील आयात शुल्क हटवले पाहिजे, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी संघटनेकडून आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. संत्रा निर्यातीच्या प्रश्नावरुन आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला आहे.

Updated on 16 October, 2023 4:00 PM IST

Amravati News : बांगलादेश संत्रा आयात शुल्कात वाढ केल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. यामुळे अमरावतीत प्रहार संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी संत्रा फेकून देत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.

संत्रावरील आयात शुल्क हटवले पाहिजे, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी संघटनेकडून आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. संत्रा निर्यातीच्या प्रश्नावरुन आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला आहे. यावेळी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्या धरपकड झाली. यामुळे कार्यकर्त्यांनी संत्रा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात फेकून दिली. सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शांतता राहावी, यासाठी आंदोलकांमधील ५ शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्या मागण्या प्रशासनाने ऐकून घेतल्या आहेत. यामुळे आगामी काळात संत्रा आयात शुल्क हटवले जाते का? हे पाहण महत्त्वाच आहे.

विदर्भातून बांगलादेशमध्ये संत्रा निर्यातीचे प्रमाण मागील काही वर्षापासून वाढले आहे. सध्या अडीच लाख टनापेक्षा जास्त संत्रा बांगलादेशला निर्यात होतो. मात्र, गेल्या काही वर्षात बांग्लादेश सरकारने टप्प्याटप्प्याने संत्रा आयातीवर आयात शुल्क वाढीचा निर्णय घेतला आहे.

English Summary: increase in import duty on oranges Strike organization aggressive protest by throwing oranges
Published on: 16 October 2023, 04:00 IST