सन 2021ते 22 करिता एक कर्जदर राज्यस्तरीय उच्च समितीने नुकतेच निश्चित केले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत पीक कर्जाच्या रकमेत यावर्षी वाढ करण्यात आली आहे.
सर्वाधिक बागायती पिकांमध्ये कापूस पिकासाठी प्रति एकरी 16 हजार रुपये वाढ करण्यात आले आहे. या वाढीनुसार आता शेतकऱ्यांना एक तरी 69 हजार रुपये पीककर्ज बँकांकडून वितरित केले जाणार आहे.
तर मागील कित्येक वर्षांचा विचार केला तर शेतकरी अनेक अस्मानी सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. परंतु या संकटांना सामोरे जाताना शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस वाईट होत गेली आहे. अशा स्थितीत बँकांद्वारे अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे कार्य सरकार करीत असते. परंतु अनेक अडचणींमुळे शेतकरी पीककर्जापासून दरवर्षी वंचित राहतात. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कुठे गेल्या वर्षी मात्र मोठ्या संख्येत शेतकरीकर्ज मुक्त झाले आणि नवीन कर्ज मिळण्यासाठी पात्र ठरले आहेत.
त्यामुळे गेल्या वर्षी अकोला जिल्ह्यात पहिल्यांदाच 75% खातेदार शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज वितरित करण्यात आले. या वर्षी पीक कर्जाचे दर निश्चित करताना राज्यस्तरीय समितीने कर्ज वितरणाची नियोजन आखतांना पिकाचे दर निश्चित केले असून त्यामध्ये पिक निहाय तीन ते चार हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यात सन 2021 व 22 साठी निश्चित केलेले प्रति हेक्टरी पीक कर्ज दर
- सोयाबीन 45 हजार ते 49 हजार
- कापूस( बागायत) 53 हजार ते 69 हजार
- कापूस( जिरायत) 43 हजार ते 52000
- ऊस( आडसाली) एक लाख 32 हजार
- खरीप ज्वारी( बागायती) 26 हजार ते 29 हजार
- खरीप ज्वारी( जिरायती) 25 हजार ते 27 हजार
- मका( जिरायत) 30000
- मका( स्वीट कॉर्न) 28 हजार
- तुर( बागायत) 36 हजार सातशे ते चाळीस हजार
- तुर( जिरायत) एकोणावीस हजार ते वीस हजार
Published on: 11 April 2021, 11:13 IST