परभणी
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत २०२३ यंदाच्या सालात १० ऑगस्टपर्यंत कपाशीची २ लाख २२ हजार ४१९ हेक्टरवर लागवड झाली आहे. जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, पालम, हिंगोली, औंढा नागनाथ या ७ तालुक्यांमध्ये कपाशीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.
परभणी जिल्ह्यात कपाशीचे सरासरीक्षेत्र १ लाख ९२ हजार २१३ हेक्टर असून, १ लाख ९० हजार २१० हेक्टर (९८.७८ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी क्षेत्र ३८ हजार ८२१ हेक्टर असतांना ३२ लाख २०९ हेक्टरवर (८२.९७ टक्के) लागवड झाली आहे.
कृषी विभागाच्या नोंदीनुसार, एकूण खरीप पिकांची ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी ५ लाख ६ हजार १६१ हेक्टरवर (९४.६३ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात कपाशीचे लागवड क्षेत्र ३७.५७ टक्के पेरणी आहे. सोयाबीनची २ लाख ६५ हजार ३२८ हेक्टरवर (१०६.२५ टक्के) पेरणी झाली आहे. एकूण पेरणीक्षेत्रात सोयाबीनचे क्षेत्र ५१.४१ टक्के आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात कडधान्यांची ४५ हजार ५०४ हेक्टर (७७.१३ टक्के) पेरणी झाली. त्यात तूर ३६ हजार ७९९ हेक्टर (८१.२२ टक्के), मूग ४ हजार हेक्टर (५९.६१ टक्के), उडीद ३ हजार ८६७ हेक्टर (६५.७८ टक्के) पेरणी झाली.
Published on: 14 August 2023, 04:50 IST