देशातील दुग्ध उत्पादनात 36.35 टक्के वाढ

Wednesday, 27 November 2019 01:11 PM


नवी दिल्ली:
देशातल्या दुध उत्पादनात 36.35 टक्के वाढ झाली असल्याचे केंद्रीय दुग्धविकास, मत्स्योत्पादन आणि पशुविकास मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितले. राष्ट्रीय दुध दिवसानिमित्त नवी दिल्ली इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 2013-14 मध्ये दुग्ध उत्पादनाचे प्रमाण 137.7 दशलक्ष टन होते. 2018-19 मध्ये ते 187.75 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे.

त्याचप्रमाणे दुधाच्या दरडोई उपलब्धतेतही वाढ झाली असल्याचे सिंह यांनी सांगितले. 2013-14 मध्ये हे प्रमाण 307 ग्रॅम होते ते 2018-19 मध्ये 394 ग्रॅमवर पोहोचले आहे. दुग्ध उत्पादनाचा वार्षिक विकासदर 2009 ते 2014 या कालावधीत 4.2 टक्के होता. तो 2014-19 या कालावधीत वाढून 6.4 टक्क्यांवर पोहोचला. आरसेपमध्ये सहभागी होण्यास नकार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 10 कोटी शेतकऱ्यांचे हित जपले आहे, असे सांगून सिंह यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

national milk day राष्ट्रीय दुध दिवस Giriraj Singh गिरीराज सिंह नरेंद्र मोदी narendra modi

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.