News

कांद्याच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सा कांद्याच्या व्यापाऱ्यांवर 13 ठिकाणी अचानक छापे टाकण्यात आले. या आयकर विभागाच्या छापामुळे कांदा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Updated on 22 October, 2021 9:54 AM IST

कांद्याच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सा कांद्याच्या व्यापाऱ्यांवर 13 ठिकाणी अचानक छापे टाकण्यात आले. या आयकर विभागाच्या छापामुळे कांदा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याच्या कांद्याच्या भावाचा विचार केला तर त्या तुलनेत गुरुवारी कांद्याचे भाव प्रति क्विंटल एक हजार रुपयांनी कमी झाले.

 यावर्षी झालेल्या पावसामुळे आणि बदलत्या हवामानाचा फटका हा साडे साठवलेल्या कांद्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. या कारणामुळे कांद्याचे आवक कमी होत आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये पावती निर्माण झाल्याने देशांतर्गत कांदा बाजार भावात वाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. ही भाववाढ नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने सहा कांदा निर्यातदार कांदा व्यापाऱ्यांच्या गोदाम, ऑफिस आणि घरी अशा 13 ठिकाणी छापे टाकले गेले.

यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि इतर बाजार समित्यांमध्ये त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यामुळे बुधवार च्या तुलनेत गुरुवारी कांद्याच्या सर्वसाधारण दरात दोनशे रुपयांची घसरण होत कांद्याचे बाजार भाव 2500 रुपयांच्या खाली गेले. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.दिवाळीच्यातोंडावरआयकरविभागानेप्रतिष्ठितकांदाव्यापाऱ्यांवरधाडीटाकल्यानेपिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

आयकर विभागाच्या सात ते आठ जणांच्या पथकाने सकाळपासून संबंधित व्यापाऱ्यांची गोदामे, कार्यालय आणि घर इत्यादींची झाडाझडती घेतली. यामध्ये कांदा खरेदीच्या पावत्या, कांदा विक्रीची बिले, बँक व्यवहार आदींसह कर भरणा संबंधित कागदपत्रांची कसून चौकशी केल्याचे समजते आहे. अचानक टाकलेल्या धाढीचे  नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

English Summary: income tax red on onion merchant in pimpalgaon basawant
Published on: 22 October 2021, 09:54 IST