News

शहादा तालुक्यात जवळपास ४ हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जात असते. मात्र यावर्षी शहादा तालुक्यात पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

Updated on 22 September, 2023 11:48 AM IST

Nandurbar News :

नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी आता संकटात सापडले आहेत.जिल्ह्यातील पपईवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभ ठाकलं आहे. जिल्ह्यात जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे. यात पावसाने ओढ दिली त्यातून शेतकऱ्यांनी कशातरी बागा जगावल्या आहेत. पण आता बागांवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

शहादा तालुक्यात जवळपास ४ हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जात असते. मात्र यावर्षी शहादा तालुक्यात पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

नंदुरबार जिल्हा पपईचे हब म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड केली जाते. पण यंदा यंदा पावसाचा खंड, वातावरणातील बदल, वाढते तापमान यामुळे पपई पिकाला याचा फटका बसला आहे. दुष्काळी परिस्थितीतही पपई उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पपई बागा जगवल्या आहेत. मात्र आता बागांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील पपई बागा उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

दरम्यान, राज्यात पपई पिकावर संशोधन करण्यासाठी पपई संशोधन केंद्र कुठे नसल्याने पपई उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे नंदुरबार येथे केंद्र आणि राज्य सरकारने पपई संशोधन केंद्र सुरू करून पपईवर येणाऱ्या विविध रोगांवर संशोधन होणे गरजेचे आहे.

English Summary: Incidence of viral disease on papaya crops in Nandurbar
Published on: 22 September 2023, 11:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)