News

आज (दि.19) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ करणार आहेत. महाराष्ट्रातील 500 ग्रामपंचातींमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जात आहेत,अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

Updated on 19 October, 2023 2:35 PM IST

आज (दि.19) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ करणार आहेत. महाराष्ट्रातील 500 ग्रामपंचातींमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जात आहेत,अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र या संकल्पनेमुळे राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

प्रत्येक केंद्रात सुमारे 100 तरुणांना किमान दोन व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण उद्योग भागीदार आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल अंतर्गत समाविष्ट असलेल्या एजन्सीद्वारे दिले जाणार आहे. या केंद्रांच्या स्थापनेमुळे ग्रामीण भागात अधिक सक्षम आणि कुशल मनुष्यबळ विकसित होण्यास मदत होईल.

राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन अधिकृतपणे पंतप्रधान मोदींनी 2015 मध्ये जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त लॉन्च केले होते. ग्रामीण भागांमध्ये आणि राज्यांमध्ये कौशल्य प्रशिक्षण उपक्रम पुढे नेण्यासाठी हे मिशन विकसित करण्यात आले.

English Summary: Inauguration of Pramod Mahajan Rural Skill Development Centers by Prime Minister
Published on: 19 October 2023, 02:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)