News

चिखली :- बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथील खडकपूर्णा प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन अंदाजे 14 वर्षे पूर्ण झाली आहेत

Updated on 16 October, 2021 6:23 PM IST

या प्रकल्पाच्या उपसा सिंचन टप्पा क्रमांक 3 व 4 मध्ये जवळपास 150 किलोमीटर लांबीचे कालवे आहेत व जवळपास 25 हजार एकर जमीन ओलिताखाली येत आहे .परंतु बऱ्याच गावातील कामे अपूर्ण असल्याने लाभधारक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शंतनु भारत बोंद्रे यांच्या नेतृत्वामध्ये व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब माजी मंत्री भारत बोंद्रे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाजेर काझी तसेच पक्ष निरीक्षक रवींद्र तौर 

यांच्या मार्गदर्शनाखाली जल समृद्धि व जनसंपर्क अभियानाचे शंतनु भारत बोंद्रे यांच्या हस्ते 15 ऑक्टोंबर 2019 रोजी चिखली तालुक्यातील मलगी या ठिकाणच्या महादेव मंदिरा पासून सकाळी 9.30 वाजता या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

 या अभियानात शेतकऱ्यांच्या समस्या चर्चा करून जानुन घेतल्या तर कीत्येकांनी निवेदनाव्दारे अडचणी मांडल्या त्या सर्व पाठपुरावा करून मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सिंदखेडराजा विधानसभा अध्यक्ष गजानन पवार चिखली तालुका अध्यक्ष गजानन वायाळ युवक काँग्रेस अध्यक्ष कृष्णा मिसाळ महिला तालुका अध्यक्ष सौ रेखाताई महाजन युवक काँग्रेसचे अंकुश थुट्टे चिखली विधानसभा सरचिटणीस प्रशांतभैया डोंगरदिवे, सुनिल सुरडकर शेनफडभाऊ घुबे, भराड साहेब ,कंकाळ साहेब ,राजुभाऊ भगत,निवृत्ती भाऊ पवार सागर पडघान, सागर अवसरमोल, विनोद सोनटक्के, भारत कस्तुरे ,सौ आशाताई कस्तुरे ,कल्पनाताई केजकर

,सौ लक्ष्मीताई गिर्‍हे सौ प्रतीभा गवई,राजुभाऊ भगत ,सुरेश परिहार ,रामेश्वर सोळंकी, नंदू वराडे, सुनील सुरडकर, दीपक शिंगणे, कडूबा टेलर,भगवान पवार, नरसिंग गाडेकर, गजानन परिहार यांच्यासह गावातील नागरीक उपस्थीत होते

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Inauguration of Nationalist Water Resources and Public Relations Campaign
Published on: 16 October 2021, 06:23 IST