1. बातम्या

प्रकाश भाऊ साबळे आणि कृषि शास्त्र समूहतर्फे क्रिषामी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे उद्घघाटन

KJ Maharashtra
KJ Maharashtra
क्रिषामी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे उद्घघाटन

क्रिषामी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे उद्घघाटन

जिल्हा परिषद सदस्य  माननीय प्रकाश भाऊसाहेब साबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिषामी फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या कार्यालयाचे व शेती उपयुक्त विविध प्रोडक्टचे लॉंचिंग करण्यात आले तसेच यावेळी कृषि शास्त्र समुह अध्यक्ष या वतीने निखिल रमेश यादव यांनी मार्गदर्शन केले.

अमरावती जिल्हय़ातील हरताळा गावांत सन 2018 रोजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांची स्थापना झाली. कृषि क्षेत्रात बदल घडून आणण्यासाठी शेतकरी उत्पादन कंपनी यांचे मोठे योगदान लक्षात घेता शेतकरी नेते माननीय प्रकाश भाऊ साहेब साबळे यांनी युवा पिढीला मदत करण्यास अमरावती जिल्ह्यात पुढाकार घेतला आहे.कार्यक्रमाची सुरुवात कंपनीच्या कार्यालयाच्या उद्घाटना पासून झाली. या नंतर भारतीय संस्कृती परंपरे नुसार संत गजानन महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व गौतम बुद्ध यांना वंदन करून कार्यकर्माची सुरुवात झाली. सर्व परिचित पाहुण्यांचे स्वागत केले गेले.त्यानंतर क्रिषामी फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या शेती उपयुक्त विविध प्रोडक्टचे लॉंचिंग करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला आमंत्रित कृषि शास्त्र समुह संस्थापक व अध्यक्ष निखिल यादव यांनी क्रिषामी फार्मर प्रोड्युसर कंपनी उपस्थित कंपनी च्या संचालकाना शुभेच्छा देवून, कृषि शास्त्र समुह कश्या प्रकारे आपल्या कंपनीच्या वाटचालीसाठी अर्थात आयात निर्यात, मार्केटिंग , प्रॉडक्शन, या सारख्या काही नावीन्यपुर्ण गोष्टी मध्ये मदत करेल या बाबत मार्गदर्शन केले. तसेच विविध योजना, उपक्रमे करून कंपनी कश्या प्रकारे आपले वार्षिक उत्पन्न वाढवू शकते  वर आपले मत मांडले.

 

शेवटी अध्यक्षीय भाषण मा. प्रकाश भाऊ साबळे यांनी दिले त्या वेळी त्यांनी सदर कंपनी ही फक्त शेतकऱ्यांचा विकासाकरिता केंद्रित बनवण्यात आलेली आहे आणि केंद्र व राज्य शासन यांच्या विविध योजना कंपनीला लागू करून त्यांचा फायदा शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त करून देणार याची ग्वाही दिली.  तसेच कृषि शास्त्र समुह अशा विविध शेतकरी उत्पादक कंपनीना एकत्रित करून शेतकरी मित्रांना मदत करण्यात आपले प्रयत्न  सुरू ठेवणार.

 

सदर कार्यक्रमास ज्ञानेश्वर काळे, जयकुमार रघुवंशी, प्रणय गवळी, छोटु भाऊ देशमुख,  कपिल ठाकरे, मंगेश हरणे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.निखिल रमेश यादव हे श्री कृष्णभूमि शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये  सुमारे पाच वर्षा पासुन डायरेक्टर पदावर कार्यरत आहे.

संपर्क क्रमांक :- 7972068969

 

प्रतिनीधी - गोपाल उगले

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters