जळगाव: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या हस्ते जैन हिल्स येथील 'आगामी शेती’ जैन कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये व्हर्टिकल फार्मिंग, हायड्रॉपोनिक, एरॉपोनिक, सॉइललेस कल्टिव्हेशन, ऑटोमेशन या तंत्रज्ञानाचे एकाच ठिकाणी सादरीकरण करण्यात आलेले आहे. मान्यवरांनी या सर्व तंत्राची माहिती घेतली.
या पार्क मध्ये विविध नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाचे वेगवेगळे दालन आहे. यामध्ये नवीन पिकांच्या व आज निर्मिती करुन असलेल्या पिकांच्या नवीन जाती जसे की, रोग प्रतिकार शक्ती, जास्त काळ टिकणे, दुष्काळाला बळी न पडणाऱ्या वाणांची निर्मिती करणे हा उद्देश आहे. यावेळी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यासमवेत कामगार कल्याणमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाने, तयार केलेल्या कुठल्याही रोपांचे व बियाण्यांचे 'क्वारेंटाइन' टेस्ट करणे जेणे करून अनावधनाने वा चुकीने कुठल्याही रोगाची आयात किंवा लागण होणार नाही या दृष्टीने महत्त्वाचे कार्य या संशोधन केंद्रात होत आहे. यामध्ये अजून एक अतिशय महत्त्वाचे दालन आहे. ज्यात माती विना शेती, हायड्रोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग यांचा समावेश आहे. आंब्याचे नारळ, कॉफी, पेरूचे टिश्यूकल्चर जैन इरिगेशनने जगात सर्वप्रथम केले. या सर्व तंत्रज्ञानाची माहिती मा. मुख्यमंत्री महोदयांनी जिज्ञासापूर्ण जाणून घेतली.
केळी टिश्यूकल्चरमुळे केळी उत्पादनात 200% पर्यंत वाढ झाली. डाळिंब टिश्यूकल्चरमुळे तेल्या व मर रोगाचा नायनाट झाला. हे प्रमुख अतिथिंनी जाणून घेतले. कांद्याचे व बटाट्याची बियाणे निर्मीती हिमाचल वा उत्तराखंडच्या थंड प्रदेशात तयार करावे लागते. वातानुकुल वातावरण तयार करून येथे बीज निर्मितीही होणार आहे. त्याचे ही दोन दालन येथे आहेत. ज्याला 'क्लायमेट न्युट्रल तंत्रज्ञान' म्हणतात. कांदा, बटाटाचे एरोपोनिक तंत्रज्ञानाने एरोट्युबर तयार करण्याची पद्धत ज्यामध्ये हवेच्या सहाय्याने बटाटे तयार होतात.
पाणी व माती विना बटाट्यांचे उत्पादन या तंत्रज्ञानाचे त्यांनी कौतुक केले. पिकांना गरज व पूरक असलेली वातावरण निर्मीती करुन विविध पिकांवर विकास व संशोधनाचे काम सुरु आहे ज्याला ‘कंट्रोल्ड क्रॉपींग सिस्टीम्स् रिसर्च एन्ड डेव्हलपमेंट’ असे म्हणतात. शेतीची व या सर्व तंत्राची माहिती अजित जैन यांनी करून दिली. या प्रोजेक्टबाबत के. बी. पाटील, डॉ. अनिल पाटील डॉ. ए. के. सिंग व डॉ. राजेश पती या तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली.
Published on: 25 February 2020, 08:14 IST