बाळापूर मधील मोखा या गावी जैविक कृषी निविष्ठा केंद्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे क्षेत्र प्रवर्तक अमोल पिसे यांनी केले आणि कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे PUM अक्षय असोलकर सर व कार्यक्रमांचे उद्घाटक म्हणून सरपंच मयुरी श्रीहर्ष खरप, शोभाबाई मानकर,भास्करराव तायडे, आणि रामकृष्ण माणिकराव तायडे जैविक निविष्ठा केंद्र धारक शेतकरी हजर होते.
यावेळी अक्षय असोलकरPUM यांनी आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शनातून BCI प्रकल्पा चे महत्व व उद्देश काय इनपुट सेटर चे महत्व व उदेश, कॉकटेल केल्याने होणारे दुष्परिणाम, PPE किट चे महत्व, घातक कीटकनाशका मुळे होणारे दुष्परिणाम समजावुन सांगितले . त्याचप्रमाणे गौतम तायडे यांनी जैविक निविष्ठा बद्धलची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे क्षेत्र प्रर्वतक सतिश गायकवाड यांनी करून शेतकर्यांना सभ्य कामे कोणती,बालमजूर पॉलिसी, याविषयी माहिती दिली, यावेळी टीम मधील सर्व क्षेत्र प्रर्वतक आशिष सोळे, राहुल ठोंबरे, अंकुश भटकर, हजर होते.
मोठी बातमी ! शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ
Published on: 09 June 2023, 12:00 IST