News

अकोला मधील गोपालखेड या बी. सी. आय. प्रकल्पाद्वारे गावामध्ये BCI महिला शेतकरी "सौ. उषा जनार्दन पिसे" यांच्या केंद्रावर दिनांक २०/०८/२०२२ रोजी जैविक कृषी निविष्ठा केंद्राचे उद्घाटन गावातील प्रगतशिल शेतकरी भाई प्रदीप देशमुख व पोलीस पाटील ज्योती ताई आडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Updated on 26 August, 2022 9:47 AM IST

अकोला (Akola) मधील गोपालखेड (Gopalkhed) या बी. सी. आय. प्रकल्पाद्वारे गावामध्ये BCI महिला शेतकरी "सौ. उषा जनार्दन पिसे" यांच्या केंद्रावर दिनांक २०/०८/२०२२ रोजी जैविक कृषी निविष्ठा केंद्राचे (Biological Agriculture Input Centre) उद्घाटन (Opening) गावातील प्रगतशिल शेतकरी भाई प्रदीप देशमुख व पोलीस पाटील ज्योती ताई आडे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी PUM अक्षय आसोलकर यांनी जैविक कृषी निविष्ठा केंद्राबद्दल माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच क्षेत्र प्रवर्तक गौतम तायडे यांनी दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्क बनवण्याची पद्धत व फायदे याबद्दल माहिती दिली.

लातूरमध्ये तब्बल १ लाख लाभार्थी ई-केवायसीविनाच! मुदत संपत आली तरीही शेतकऱ्यांची ई-केवायसीकडे पाठ

एकनाथ मापारी सर यांनी शेतकऱ्यांना बी. सी. आय. प्रकल्पातील सात तत्वांबद्दल संपूर्ण माहिती दिली." क्षेत्र प्रवर्तक सतीश गायकवाड सर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन करून फवारणी करताना काय काळजी घ्यायला हवी व PPE किट चे महत्त्व शेतकऱ्यांना सांगितले.

शासनाचा अजब कारभार! चक्क येड्या बाभळीच्या झुडपात लावलंय पर्जन्यमापक यंत्र

या कार्यक्रमाला श्री. एकनाथ मापारी सर, प्रकल्प समन्वयक कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, मलकापूर प्रमुख पाहुणे, ज्योती ताई मोडक सरपंच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्तिथ होते तसेच गावातील BCI शेतकरी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली, क्षेत्र प्रवर्तक अमोल पिसे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

महत्वाच्या बातम्या:
Weather Update: महाराष्ट्रात आजही मुसळधार पावसाची शक्यता! हवामान खात्याचा अलर्ट जारी
Health News : जिभेचा रंग सांगणार तुमच्या आरोग्याची स्थिती; जाणून घ्या कसे ते?

English Summary: Inauguration of Biological Agriculture Input Center at Gopalkhed
Published on: 26 August 2022, 09:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)