News

आपण बघतो की, ग्रामीण भागात बाजार समितीत शेतकरी आपला भाजीपाला (APMC) विक्रीसाठी आणतात. हा शेतमाल खरेदी करण्यासाठी व्यापारी लिलाव पुकारत असतात, त्यानुसार बोली लागते. आणि व्यवहार पूर्ण होतो.

Updated on 19 October, 2022 10:49 AM IST

आपण बघतो की, ग्रामीण भागात बाजार समितीत शेतकरी आपला भाजीपाला (APMC) विक्रीसाठी आणतात. हा शेतमाल खरेदी करण्यासाठी व्यापारी लिलाव पुकारत असतात, त्यानुसार बोली लागते. आणि व्यवहार पूर्ण होतो.

हा शेतमाल व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी करत असतात. असेच येवला तालुक्यातील अंदरसुल बाजार समितीत मका आणि इतर भुसार मालाचा शुभारंभ माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाला. यावेळी भुजबळ यांनी शेतकऱ्यांनी आणलेली मका आणि शेतमालाचा लिलाल पुकारला.

यावेळी मोठ्या प्रमाणावर व्यापारी देखील उपस्थित होते. व्यापाऱ्यांनी भुजबळांच्या लिलाव पुकारण्याला प्रतिसाद दिला, आणि व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला. यामुळे छगन भुजबळ यांनी अगदी व्यापारी भाषेतच बोली लावल्याचे दिसून आले.

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

भुजबळ यांनी एकेकाळी बाजार समितीतून भाजीपाला देखील खरेदी केला आहे. यामुळे त्यांना याबाबत सगळी माहिती आहे. भुजबळांचा हाच विषय शेतकरी वर्गात चर्चेचा विषय ठरत आहे.

सेंद्रिय शेतीसाठी रासायनिक कीटकनाशकांची चिंता सोडा, कडुलिंबाचा हा पर्याय घरीच बनवा

दरम्यान, नुकत्याच झालेल्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भुजबळ यांनी याबाबत आपण काम केले असल्याचे सांगितले होते. भुजबळ नेहेमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.

महत्वाच्या बातम्या;
कृषी विकास परिषद 2022: सेंच्युरियन वर्ल्ड स्कूल येथे कृषी विकास परिषद
बंगालच्या उपसागरात धडकणार चक्री वादळ, प्रादेशिक हवामान केंद्राची माहिती
म्हशीची ही जात 700 ते 1200 लिटर दूध देते, दूध उत्पादकांना मिळणार बंपर कमाई

English Summary: inauguration called auction, different estimate Chhagan Bhujbal farmers
Published on: 19 October 2022, 10:49 IST