News

गतवर्षी राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस त्राहिमाम् माजवत होता, त्यामुळे शेतकरी राजांचे मोठे नुकसान झाले होते. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी, तर कधी ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी राजांवर एक संकटांची मालिकाच ओढावून आली होती. निदान या नवीन वर्षात तरी या संकटातून मुक्ती मिळेल अशी शेतकरी राजांना आशा होती, मात्र यावर्षी निसर्गाचा लहरीपणा वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रकर्षाने जाणवत आहे. संपूर्ण राज्यात बेमोसमी पाऊस तसेच गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे.

Updated on 18 January, 2022 7:35 PM IST

गतवर्षी राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस त्राहिमाम् माजवत होता, त्यामुळे शेतकरी राजांचे मोठे नुकसान झाले होते. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी, तर कधी ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी राजांवर एक संकटांची मालिकाच ओढावून आली होती. निदान या नवीन वर्षात तरी या संकटातून मुक्ती मिळेल अशी शेतकरी राजांना आशा होती, मात्र यावर्षी निसर्गाचा लहरीपणा वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रकर्षाने जाणवत आहे. संपूर्ण राज्यात बेमोसमी पाऊस तसेच गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे.

अवकाळी पाऊस व बदलत्या ढगाळ वातावरणामुळे राज्यात सर्वात जास्त हरभरा पिकाचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. मात्र ढगाळ वातावरण अद्यापही राज्यात सर्वत्र नजरेस पडत आहे, तसेच राज्यात गारवा देखील अधिक वाढला आहे यामुळे हरभरा पिकास समवेतच आता गव्हाचे देखील मोठे नुकसान होत असल्याचे समोर येत आहे. गहू हे एक रब्बी हंगामात घेतले जाणारे मुख्य पीक आहे, या गव्हाच्या पिकावर आता सततच्या ढगाळ वातावरणामुळे वेगवेगळ्या रोगांचे सावट नजरेस पडत आहे. यासाठी कृषी वैज्ञानिकांनी गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोलाचा सल्ला देखील जारी केला आहे.

यावर्षी राज्यातील तमाम गहू उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीच्या अनुषंगाने चांगल्या प्रतीचे बियाणे, योग्य खतांचे व्यवस्थापन करून, योग्य पाण्याचे व्यवस्थापन करून रब्बी हंगामात गव्हाची पेरणी केली आहे. मात्र असे असले तरी बदलते हवामान गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी डोकेदुखी सिद्ध होताना दिसत आहे. बदलत्या हवामानामुळे गव्हाच्या पिकावर राज्यात सर्वत्र तांबेरा नामक ग्रहण नजरेस पडत आहे. शेतकरी मित्रांनो जर तांबेरा रोगावर वेळीच नियंत्रण केले गेले नाही व त्यासाठी योग्य त्या उपाययोजना आखल्या गेल्या नाहीत तर यामुळे गव्हाच्या उत्पादनात मोठी घट घडण्याची शक्यता असते. शेतकरी मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे तांबेरा रोगाचा प्रसार गव्हावर खूप जलद गतीने होत असतो. हा रोग गव्हावर दिसताच क्षणी यावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने अथवा अनुभवी शेतकऱ्यांच्या सल्ल्याने करणे महत्त्वाचे ठरते नाही तर यामुळे गव्हाच्या उत्पादनात मोठी हानी होऊ शकते. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की गव्हावर यावर्षीचा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसला आहे असे नाही दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मार्चच्या मध्यापर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव गव्हाच्या पिकावर जास्त प्रकर्षाने दिसून येतो. गव्हाचे क्षेत्र अलीकडे थोडेफार वधारलेले आहे त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र नजरेस पडत आहे.

तांबेरा रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना

शेतकरी मित्रांनो तांबेरा रोगावर नियंत्रण मिळवणे आधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांबेरा रोगाची ओळख पटविणे अनेकदा शेतकरी बांधव तांबेरा रोग ओळखण्यास चूक करतात आणि त्यामुळे तांबेरा नसतानादेखील तांबेरा वरील बुरशीनाशके गव्हाच्या पिकावर फवारले जातात त्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता असते म्हणून सर्वप्रथम तांबेरा रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी तांबेरा रोगाची ओळख पटवून घेणे महत्त्वाचे ठरते. अनेकदा गव्हाच्या पिकात पोषक तत्वांची कमतरता होत असते त्यामुळे देखील गव्हाची पाने पिवळी पडतात आणि शेतकरी बांधव त्याला तांबेरा रोग समजून घेतात. मित्रांनो तांबेरा रोग ओळखण्यासाठी एक सर्वात सोपी प्रक्रिया म्हणजे, गव्हाच्या ज्या पानांवर आपणास तांबेरा रोगाची लागण झालेली आहे असे वाटत असेल त्या पानांना तोडून आपापसात घासायची, जर तांबेरा रोग असेल तर त्याचे बुरशीचे कण आपल्या हाताला चिटकतात आणि हळदी सारखा रंग दिसतो. मात्र जर पोषक तत्वांची गव्हामध्ये कमतरता असेल तर असे होणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम तांबेरा रोगाची ओळख पटविणे हे महत्त्वाचे कार्य आहे आणि यावर शेतकरी बांधवांनी व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे असते.

शेतकरी मित्रांनो तांबेरा रोगाची एकदा की ओळख पटली, तर लगेचच प्रोपकोनाझोल 100 मिली 100 लिटर पाण्यासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करण्याचा कृषी वैज्ञानिक सल्ला देत असतात. कृषी तज्ञांच्या मते, एचडी 2967, एचडी 2851, डब्ल्यूएच 711 गव्हाच्या या जातींमध्ये सर्वात जास्त तांबेरा रोगाची लागण होण्याची शक्यता असते त्यामुळे गहू पेरणी करताना सर्वप्रथम ज्या गव्हाची रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते त्याच गव्हाची पेरणी करावी त्यामुळे तांबेरा रोगाची लागण होण्याचा धोका हा कमी होऊन जातो आणि त्यामुळे उत्पादनात घट होत नाही.

English Summary: in wheat crop this disease spreading alot because of this
Published on: 18 January 2022, 07:35 IST