सोयाबीन आणि कापूस ही खरीप हंगामातील दोन प्रमुख पिके आहेत. जर आपण मागच्या वर्षाचा विचार केला तर या दोन्ही पिकांना म्हणजेच कापूस आणि सोयाबीनला कधी नव्हे एवढे उच्चांकी दर मिळाले. कारण मागच्या वर्षी जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर झालेल्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादनात घट आल्याने ही भाववाढ झाली असे आपण म्हणू शकतो.
नक्की वाचा:कापसाला मिळणार उच्चांकी भाव! कापूस निघण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात
यासोबतच काही आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजाराची परिस्थितीत देखील कारणीभूत होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर या वर्षी या दोन्ही पिकांचे लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज होता व तशी ती वाढ पाहायला मिळाली.
परंतु यावर्षी देखील बऱ्याच ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस आणि सोयाबीन या पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले. परंतु या सगळ्या संकटांना मधून जे काही सोयाबीनचे पीक सध्या आहे ते आता हळूहळू बाजारपेठेत विक्रीसाठी येऊ लागले आहे.
नक्की वाचा:संकटांची मालिका संपेना! शेतकऱ्यांची चिंता वाढली, सोयाबीनवर लष्करी अळीचा हल्ला
या सगळ्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील येथील एका शेतकऱ्यांनी त्यांचे 35 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणले असता या नवीन सोयाबीनला प्रतिक्विंटल पाच हजार 701 रुपयांचा दर मिळाला. विशाल केंदळे नामक या शेतकऱ्यांनी यावर्षी लागवड केलेल्या नवीन सोयाबीनची काढणी केली व हा दर त्यांना वाशिम बाजार समितीत खरेदीच्या मुहूर्तला मिळाला.
या सोयाबीन लिलावाच्या मुहूर्त प्रसंगी या शेतकऱ्यांचा सत्कार बाजार समितीचे सचिव भगवानराव इंगळे यांनी केला. यावेळी बाजार समितीतील बरेच मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते.
नक्की वाचा:सल्लागार मंडळाची स्थापना! आरोग्य आणि शिक्षणासह कृषी विभागावर राहणार सरकारचे लक्ष
Published on: 08 September 2022, 09:23 IST