अकोला--येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी सहाय्यक पदाच्या 47जागांसाठी परवाला म्हणजेच दि14नोव्हेंबर ला परीक्षा होणार आहे.या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी यांनी आॅनलाइन अर्ज केले आहेत.परंतु सद्याच्या परीस्थीतीत एस टि कर्मचारी यांचा संप असल्यामुळे बसगाड्या बंद आहेत.या संपाच्या अनुषंघाने कर्मचारी यांचे निलंबन झाल्यामुळे तिव्र आंदोलने देखील ठिकठिकाणी होतांना दिसत आहेत.असंख्य कर्मचारी यांचे निलंबन झाल्यामुळे हा संप मिटनार नसल्याने बसेस बंद असल्याने विद्यार्थी परीक्षा सेंटरवर वेळेत पोचु शकनार नसल्याने परवाला होऊ घातलेली कृषी विद्यापीठाची कृषी सहाय्यक पदभरती रद्द करुण पुढे ढकलण्याची मागणी स्वाभिमानी चे नेते तथा डॉ पंदेकृवि चे सदस्य विनायक सरनाईक यांनी केली आहे.
अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 47जागांसाठी कृषी सहाय्यक पदांची भरती प्रक्रीया राबवण्यात येत आहे.यासाठी सन2019मध्ये आॅनलाईन अर्ज सुद्धा विद्यार्थी यांनी केले आहेत.कोरोना काळात हि पदभरती लांबनीवर पडल्यानंतर याची मागील महिण्यात आरोग्य भरती परीक्षे दिवसी निश्चित करण्यात आली होती.त्यावेळी सुद्धा विद्यार्थी आरोग्य भरती पेपर देतील का?कृषी सहाय्यक पदाचा असा प्रश्न कार्यकारी परीषदेने उपस्थीत केल्याने हि चुक कृषी विद्यापीठाच्या लक्षात आल्याने हि पदभरती परवाला म्हणजेच १४नोव्हेबर ला घेण्याचा निर्णय कृषी विद्यापीठाकडुन घेण्यात आला आहे.परंतु एस टि कर्मचारी यांचा संप निलंबनामुळे चिघळला असल्याने परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षेसाठी सकाळी दिलेल्या वेळेत पोचु शकणार नसल्याने
हि पदभरती घेण्याचा प्रयत्न केल्यास किवा झाल्यास असंख्य विद्यार्थी या परीक्षेपासुन वंचीत राहु शकतात आरोग्य विभागाची पदभरती वादात सापडल्याने व संबंधीत विभागाकडुन असंख्य अडचणी निर्माण झाल्याने वेळेत पेपर न मिळणे व इतर कारणांमुळे आरोग्य विभागाची बदनामी झाली होती.व यामुळे होतकरु विद्यार्थी यांना पदभरती पासुन वंचीत रहावे लागले होते.आरोग्य भरतीच्या गोंधळ जन्य परीस्थीतीचा विचार करीत व दुरवरुण येणारे विद्यार्थी यांच्या प्रती चिंता व्यक्त करीत विद्यार्थी दिलेल्या वेळेत सेंटरवर पोचु शकणार नसल्याने परीक्षा वेळ सकाळचीच असल्याने आरोग्य भरती सम अडचणी निर्माण होऊन आपल्या कृषी विद्यापीठाची बदनामी होणार नाही.
व विद्यार्थी या परीक्षेपासुन वंचीत राहु नये,व कार्यकारी परीषद सदस्य व विद्यार्थी संघटनेच्या मागणीचा विचार करीता परवाची १४नोव्हेबरची कृषी सहाय्यक पदभरती आजच रद्द करुण पदभरती पुढे ढकलण्यात यावी,अशी बुलढाणा येथील स्वाभिमानी चे नेते तथा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी सदस्य विनायक सरनाईक यांनी पत्राव्दारे कृषीमंत्री,कुलगुरु,कुलसचिव यांच्याकडे केली आहे.
Published on: 12 November 2021, 06:27 IST