सध्या सर्व भागात ऊसतोड चालू आहे.आणि इतर वर्षीपेक्षा यंदाचा हंगाम जोराचा झाला आहे. ऊस हे एक नगदी पीक आहे बक्कळ पैसा मिळवतो म्हणून शेतकरी उसाची लागण करत असतो. परंतु शेतातील सगळा ऊस तुटून कारखान्याला गेला म्हणजे सगळं झालं असे नाही. त्यानंतर खरे राणाचे आणि पाचटीचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी नियोजन करणे खूप गरजेचे आहे. कारण पाचटीचे योग्य व्यवस्थापन करणे आपल्याच फायद्याचे आहे.
खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत :
शेतातील ऊस तुटून कारखान्याला गेल्यावर माग राहते ती म्हणजे उसाची पाचट बरेच शेतकरी याकडे लक्ष्य देत नाही परंतु रानातील पाचट सुद्धा फायदेशीर ठरत आहे. ऊस तुटून गेल्यावर शेतकरी वर्ग उसाची पाचट पेटवून देतो. परंतु पाचट पेटवून त्यापासून काहीच फायदा आपल्याला होत नाही. तसेच सध्या च्या काळात खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्यासाठी उसाच्या पाचटाचे योग्य व्यवस्थापन करून आपण सुद्धा खतनिर्मिती करून पैसे वाचवू शकतो.
उसाच्या पाचटीचे व्यवस्थापन कसे करावे:-
ऊस तुटून गेल्यावर निघणाऱ्या पाचटाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे खूप गरजेचे आणि फायदेशीर आहे.ऊस तुटून गेल्यावर बळीराजा एक तर ती उसाची पाचट जाळून तरी टाकतो नाही तर जनावरांच्या पुढं तरी टाकतो. परंतु पाचटाचे योग्य व्यवस्थापन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. उसाची पाचट शेतातच कुजवावी त्यासाठी कल्चर चा यंत्राचा वापर करावा किंवा ऊस तुटून गेल्यावर त्याच रानात पाणी सोडून द्यावे पाणी देऊन देऊन ती पाचट पूर्णपणे रानातच कुजवून घालवावी. यामुळे शेतातील जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते शिवाय शेतामध्ये तण कमी उगावते. पाचट कुजल्यामुळे शेताला खतांची आवश्यकता कमी भासते आणि शेतकरी वर्गाचे सुद्धा पैसे वाचतात. त्यामुळे शेतातील पाचट जाळू नये त्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
शेतकरी पाचटाचे काय करतो:-
शेतीमधील एकदा ऊसतोड होऊन कारखान्याला ऊस गेला की शेतकरी शेतातील सर्व पाचट एका जागी गोळा करून पेटवून देत असतो. पाचट जळल्यामुळे आणि आगीमुळे जमिनीचा पोत सुधरवणाऱ्या जीव आणि जंतूंचा नाश होतो. शिवाय धुरामुळे वातावरण सुद्धा दूषित होत असते. तसेच आगीमुळे जमिनीचा ऱ्हास सुद्धा होतो. त्यामुळे ऊस तोडणी झाल्यावर पाचटाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ऊस तुटून गेल्यावर ट्रॅक्टर च्या साह्याने कल्चर च्या मदतीने त्या पाचटिची बारीक कुटी किंवा भुगा करावा. भुगा केल्यानंतर शेतामध्ये युरिया आणि सुफर फास्फेट खत टाकून पाणी द्यावे. जेणेकरून पाचट लवकरात लवकर कुजून त्याचे खतामध्ये रूपांतर होईल. याचा उपयोग शेतीला सेंद्रिय शेतीसारखा होतो. त्या उसाच्या पाचटीमुळे ऊस किंवा अन्य पीक सुद्धा चांगले येण्यास मदत होते.
Published on: 13 February 2022, 10:57 IST