महाराष्ट्र हे कांदा उत्पादनातील देशात सर्वात आघाडीवर असणारे राज्य आहे. मात्र महाराष्ट्रात अनेकदा कांद्याला भाव मिळत नाही. यावरून अनेकदा वाद-विवाद, आंदोलन, आरोप प्रत्यारोप चालूच असतात. अनेकदा राज्यातील शेतकऱ्यांना आपला कांदा अत्यल्प भावात विकावा लागला आहे तर कधी फेकून द्यावा लागला आहे.
अनेकदा कांद्याचे भाव गडगडत असल्यामुळे शेतकरी हवालदिल होतात. सध्या महाराष्ट्रात कांदा १००-२०० रुपये प्रती क्विंटल दराने विकला जात आहे. परंतु व्यापारी खरेदी करून हा कांदा कुठे विकतात? इतर राज्यात कांद्याला भाव किती आहे? याबाबत आपल्याला प्रश्न पडत असेलच.
महाराष्ट्रापेक्षा बिहार आणि उत्तर प्रदेशात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. भारतातील कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी ५.६१ टक्के कांदा बिहारमध्ये उत्पादन होतो. बिहारमध्ये कांद्याला १००० ते १६०० रुपये भाव आहे. उत्तर प्रदेशातही कांद्याला चंगला भाव मिळतोय. तर केरळ मध्ये ४५०० रुपये भाव मिळतोय.
महाराष्ट्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात. अहमदनगर येथे कांद्याला २०० रुपये भाव मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले, एवढा कमी भाव मिळाल्यास शेतकऱ्यांचा खर्च निघणेही कठीण आहे अशात त्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात कांदा उत्पादन उत्पादन चांगले आहे पण भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकार विषयी नाराजी आहे.
कांदा उत्पादकांसाठी अनेकदा सरकारने अनुदान योजना राबवल्या आहेत पण त्या जास्त प्रभावशाली राहिल्यात असे नाही त्यामुळे सरकारने कांद्याला एमएसपी प्रमाणे भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी अनेकदा केली आहे. पण त्यावर सरकारकडून विशेष निर्णय झालेला नाही कारण कांद्याचे भाव हे अनेकदा निर्यात व उत्पादनावर अवलंबून असतात.
महत्वाच्या बातम्या
बातमी कामाची: कुसुम सोलर पंप योजनेचा आजच्या घ्या लाभ; 'या' जिल्ह्यात नोंदणी कार्य सुरु
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे! खत कंपन्यांकडून खतांचे ग्रेडनुसार किंमत निश्चित, पहा आणि वाचा खतांच्या किमती
Published on: 17 May 2022, 11:23 IST