आपल्या भारत देशाला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते. कारण यामध्ये पिकांची विविधता आढळून येते. आपल्या भागातील शेतकरी वेगवेगळ्या पिकांची उत्पादन घेत असतात त्यामध्ये ऊस कापूस मका ज्वारी बाजरी हरभरा मूग इत्यादी प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेत असतात.परंतु सध्या च्या काळात तरुण वर्ग शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळी पिके घेत आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आघाडीवर आहेत. या मध्ये कौतुकाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्यातील काही शेतकरी सफरचंद तसेच विदेशी फळांचे सुद्धा उत्पादन काढून मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहेत.
गाव काळ्या ऊसाच्या लागवडीसाठी देशभर प्रसिध्द आहे:
आपण आपल्या रानात वेगवेगळ्या प्रजातीचे ऊस पाहिले असतील. उसाचा उपयोग सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु या लेखात आम्ही अश्याच एका विदेशी उसाची लागवड महाराष्ट्र राज्यातील छोट्या गावात होऊ शकते याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.महाराष्ट्र राज्यातील वाशीम शहरापासुन ५ कि.मी अंतरावर असलेल्या काटेपुर्णा व पुस या दोननदीच्या पात्रात असलेल्या काटा हे गाव काळ्या ऊसाच्या लागवडीसाठी देशभर प्रसिध्द आहे. दोन्ही नद्यांच्या पाण्यामुळे येथील भागातील ऊस शेती समृद्ध झाली आहे. तसेच उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात काळ्या उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले गेल्यामुळे देशभर या गावाची आणि काळ्या उसाची चर्चा आहे.
काळ्या उसाचे वाण:-
१८ व्या शतकात मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे नाना शंकर शेठ म्हणजेच जगन्नाथ यांनी खास मॉरिशस मधून या काळ्या उसाचे बेणे आणले होते. काही काळाने याच उसाच्या वाणाची शेती काटा या गावातील लोकांनी करायला सुरुवात केली. जगन्नाथ यांनी मॉरीशियस वरून आणलेल्या उसाला मॉरीशियस ऊस असे सुद्धा म्हटले जाते.
बाजारभाव:-
इतर उसाच्या तुलेनंत या उसाला बाजारात मोठी मागणी आहे तसेच या उसाला भाव सुदधा चांगल्या हमीचा भाव मिळत आहे. या काळ्या उसाला महाराष्ट्र राज्याबरोबरच मध्यप्रदेश, तेलंगणा व गुजरात या राज्यात सुद्धा मोठी मागणी आहे. काटा या गावात हजारो एकर क्षेत्र काळ्या उस लागवडी खाली आहे तसेच यातून बक्कळ पैसे सुद्धा ऊस उत्पादक शेतकरी कमवत आहेत.
Published on: 03 February 2022, 02:25 IST