News

या हंगामात कापसाने गेल्या पन्नास वर्षातील रेकॉर्ड मोडीत काढत विक्रमी दर प्राप्त केला आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच कापसाला चांगला समाधानकारक बाजार भाव प्राप्त होत आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे व अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसावर मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळाला होता, त्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट घडल्याचे सांगितले जात आहे. तसेच गेल्या काही वर्षापासून तसेच या हंगामात देखील कापसाच्या क्षेत्रात देखील लक्षणीय घट झाल्याचे सांगितले जात आहे. दिवसेंदिवस उत्पादनात होणारी घट व उत्पादन खर्चात होणारी वाढ यामुळे अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवली परिणामी कापसाच्या क्षेत्रात विक्रमी घट घडून आली.

Updated on 29 January, 2022 5:22 PM IST

कापसाच्या उत्पादनात झालेल्या लक्षणीय घटमुळे मसाला या हंगामात कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला. अकोला जिल्ह्यात देखील सध्या कापसाला चांगली झळाळी प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात अकोट बाजार समिती कापसाच्या खरेदीसाठी विशेष ओळखली जाते, सध्या याच बाजार समितीत कापसाला 10 हजार 800 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी बाजार भाव प्राप्त होत आहे. गुरुवारी अकोट येथील बाजार समितीत कापसाला 10 हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी दर मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. शेतकरी मित्रांनो मागील पंधरवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचे सावट कायम राहिले आहे, त्यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात असलेली कापूस वेचणी प्रभावित झाली आहे शिवाय यामुळे कापसाचा दर्जा खालावला असून उत्पादनात घट झालेली आहे. जिल्ह्यात आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मजूर टंचाईमुळे कापूस वेचणीसाठी अडथळे येताना नजरेस पडत आहेत. अकोट मध्ये कापसाला विक्रमी बाजार भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी अकोट कडे मोर्चा वळवला आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी कापूस विक्रीसाठी अकोट येथे गर्दी करत आहेत.

यावर्षी कापसाच्या उत्पादनात दुपटीने वाढ झाली असल्याचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. कापूस वेचणी साठी मजुरांची जिल्ह्यात तारांबळ उडाली असल्याने मजुरांना वाढीव मजुरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी लागत आहे. वाढती मजुरी, वाढत्या वाहतुकीचा खर्च, वाढलेल्या बियाण्यांचा औषधांचा खर्च यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असली तरी सध्या मिळत असलेल्या बाजार भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. अकोट येथे कापसाला मिळत असलेल्या उच्चांकी दरामुळे बाजार समितीत कापसाची आवक प्रचंड वधारले असल्याचे चित्र यावेळी नजरेस पडले.

कापसाला मिळत असलेला बाजार भाव हा जरी समाधानकारक असला तरी कापसाच्या बाजार भावात अजून वाढ होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांकडून व्यक्त केली जात आहे. एकंदरीत बनलेल्या परिस्थितीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा हंगाम मोठा लाभप्रत सिद्ध झाल्याचे समोर येत आहे.

English Summary: In this place, cotton in the house of eleven thousand; Rates will increase but
Published on: 29 January 2022, 04:48 IST