राज्यात सर्वत्र लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक नजरेस पडत आहे, शेतकरी बांधवांची खरीप हंगामातील लाल कांद्याची काढणीसाठी लगबग बघायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड केली गेली होती, आणि आता जिल्ह्यात सर्वत्र कांदा काढण्याचे काम (Onion Harvesting) जोमाने सुरू आहे.
जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा (Kalvan, Satana, Malegaon, Devla) अर्थातच कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात लाल कांदा बाजारात हजेरी लावताना दिसत आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज थोडीशी दिलासा देणारी बाब समोर आली आहे. मुंबई मध्ये लाल कांद्याला विक्रमी 3500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला, त्यामुळे ही बातमी निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (For onion growers) दिलासादायक ठरणारी आहे. मुंबईच्या कांदा बटाटा मार्केट मध्ये जवळपास आज 10 हजार 418 क्विंटल एवढी दर्जेदार आवक नोंदविण्यात आली आहे.
आणि इथे कमीत कमी दर 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा होता तर जास्तीत जास्त दर 3500 रुपये प्रति क्विंटल एवढा होता तसेच सर्वसाधारण दर 2650 रुपये पर्यंत लाल कांद्याला मिळत होता. असे असले तरी आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या लासलगाव कांदा मार्केट मध्ये लाल कांद्याला 2480 एवढा जास्तीत जास्त दर मिळाला तसेच किमान दर इथे हजार रुपये पर्यंत होता. लासलगाव मार्केट मध्ये पंधरा हजार दोनशे क्विंटल एवढी आवक नोंदविण्यात आली आहे. तसेच लासलगाव मार्केट मध्ये सर्वसाधारण दर हा 2170 एवढा मिळाला.
शेतकरी मित्रांनो लासलगाव मार्केट (Lasalgaon Market) मध्ये मिळालेले बाजारभाव देशातील इतर बाजार समितीमध्ये प्रभाव टाकतात. त्यामुळे लासलगाव मार्केटला एक प्रमुख सूत्रधार मार्केट म्हणून नेहमीच ओळखले जाते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अजून दरवाढीचची अपेक्षा आहे. मात्र असे असले तरी मिळत असलेला बाजारभावात कांदा उत्पादक शेतकरी समाधान मानताना दिसत आहे.
Published on: 07 January 2022, 03:09 IST