पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात यावर्षी गव्हाच्या क्षेत्रात कमालीची घट नमूद करण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे भारतात सर्वत्र रब्बी हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यात देखील बऱ्याच अंशी गव्हाची लागवड नजरेस पडते मात्र असे असले तरी या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात गव्हाच्या लागवडीसाठी शेतकरी राजांनी पसंती दर्शवली नाही. यावर्षी निफाड तालुक्यात देखील गव्हाची लागवड लक्षणीय कमी झाली आहे.
शेती क्षेत्रातील जाणकार लोक सांगत आहेत की, तालुक्यासमवेतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा या नगदी पिकाच्या लागवडीकडे वाढता कल गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याचे प्रमुख कारण आहे. गेल्या वर्षी उन्हाळी कांद्याच्या काढणीनंतर सुमारे एक महिन्यांनी म्हणजे जून जुलैच्या दरम्यान कांदा पिकाचे बाजार भाव कमालीचे वधारले आणि तेव्हापासून आजतागायत कांद्याच्या दरात स्थिरता बघायला मिळत आहे. कांद्याच्या बाजारभावात असलेली ही स्थिरता शेतकऱ्यांना चांगलीच भोवली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. या एकंदरीत तयार झालेल्या समीकरणामुळे जिल्ह्यातील गव्हाच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यातील कृषी अधिकारी श्रीमान बी जी पाटील यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी रब्बी हंगामात सुमारे 14 हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी केली जाते, मात्र या एवढ्या मोठ्या क्षेत्रात यावर्षी कमालीची घसरण बघायला मिळाली आहे. यावर्षी आतापर्यंत फक्त बारा हजार हेक्टर क्षेत्रावरच गव्हाची पेरणी नमूद करण्यात आली आहे. म्हणजे यावर्षी सुमारे दोन हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी गव्हाऐवजी इतर पिकांना प्राधान्य दिले आहे. तालुक्यातील कृषी अधिकारी अनुसार या वर्षी 15 टक्के गव्हाच्या क्षेत्रात कपात झाली आहे.
निफाड तालुका समवेतच नाशिक जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी केली जाते. दरवर्षी साधारणता नाशिक जिल्ह्यात 63 हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी केली जाते. मात्र असे असले तरी यावर्षी गव्हाच्या क्षेत्रात घट नमूद करण्यात आली आहे आणि आत्तापर्यंत जिल्ह्यात 55 हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी केली गेली आहे. म्हणजे या रब्बी हंगामात सुमारे 18 टक्के गव्हाच्या पेरणीत घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की अजून एक महिना गव्हाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे वाव आहे त्यामुळे अजून किती क्षेत्रावर गव्हाची पेरणी केली जाते हे बघण्यासारखे असेल असे असले तरी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी गव्हाच्या पेरणीत खूपच तफावत नजरेस पडत आहे. त्यामुळे गव्हाच्या लागवडीत यावर्षी कमालीची घट होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
Published on: 13 January 2022, 01:56 IST