या रब्बी हंगामात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात रब्बी कांदा लागवड करण्यात आली आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून वातावरणात वारंवार होत असलेल्या बदलामुळे मोठ्या चिंतेत सापडला आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून दाट धुक्याची चादर रब्बी हंगामातील कांदा पिकासाठी खूपच घातक सिद्ध होत आहे. जिल्ह्यात सर्वत्र दाट धुके आणि मोठ्या प्रमाणात शीतलहर नजरेस पडत आहे यामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, यामुळे विशेषता कांदा पिकावर करपा रोग प्रकर्षाने जाणवत आहे. जिल्ह्यात तयार झालेल्या या दूषित वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे. जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी उत्पादन खर्च देखील काढणे आता मुश्किलीचे होणार असल्याचे सांगत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात या हंगामात मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध आहे, सांगली जिल्ह्यात देखील पाण्याचा साठा प्रचंड वाढला आहे आणि म्हणूनच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बागायती शेती समवेतच कोरडवाहू शेतीत देखील रब्बी हंगामातील कांदा लागवडीचे धाडस केले. आता रब्बी हंगामातील कांदा लागवड करून सुमारे दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे, रब्बी हंगामातील कांदा आतापर्यंत फक्त लिंबूच्या आकाराचा तयार झाला आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात तयार झालेल्या दाट धुक्याच्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कांदा पिकाची पात पिवळी पडत जाते आणि संपूर्ण कांदा हळूहळू करपतो. त्यामुळे कांद्याच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो आणि कांदा पाहिजे तसा पोसला जातं नाही परिणामी यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असते.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी करपा रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी केली, मात्र दाट धुक्याची चादर दररोज जिल्ह्यात पडत असल्याने महागड्या औषधांचा देखील कांदा पिकावर कुठलाच असर होताना दिसत नाही, यामुळे उलट शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. रब्बी हंगामातील उशिरा लागवड केलेला कांदा सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत, या अशा उशिरा लागवड केलेल्या कांद्यावर देखील करपा रोग बघायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, थंडीच्या हंगामात कांद्याचे पीक हे जोमदार वाढत असते शिवाय यामुळे कांदा चांगला पोसला जात असतो, मात्र जिल्ह्यात सतत थंडी पडत नसून वातावरणात वारंवार मोठा बदल होत आहे, त्यामुळे जरी जिल्ह्यात थंडी वाढलेली असली तरी ती कांदा पिकासाठी यावेळी उपयोगाची नसल्याचे जिल्ह्यातील प्रगत शेतकरी सांगताहेत.
जिल्ह्यातील शेतकरी करपा रोगाच्या नियंत्रणासाठी महागड्या औषधांची फवारणी करण्यात व्यस्त आहेत, रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांकडे कांद्याची रोपे उपलब्ध नव्हती म्हणून शेतकऱ्यांनी चढ्या दराने कांद्याची रोपे विकत घेऊन कांदा लागवड केली आहे. परंतु जिल्ह्यात सध्या बनलेली स्थिती लक्षात घेता महागड्या औषधांचा खर्च आणि चढ्या दराने विकत घेतलेल्या रोपांचा खर्च देखील काढणे आता मुश्कील होऊन बसणार आहे.
Published on: 24 January 2022, 10:44 IST