News

विजेच्या बाबतीत विचार केला विजेची असलेली प्रचंड थकबाकी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक बातमी येत आहे ती म्हणजे देशातील तेरा राज्यांमध्ये नागरिकांना विविध संकटाला सामोरे जावे लागणार असून या राज्यांकडे असलेले विज बिल थकबाकी हे एक प्रमुख कारण त्यामागे आहे.

Updated on 19 August, 2022 1:21 PM IST

 विजेच्या बाबतीत विचार केला विजेची  असलेली प्रचंड थकबाकी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक बातमी येत आहे ती म्हणजे देशातील तेरा राज्यांमध्ये नागरिकांना विविध संकटाला सामोरे जावे लागणार असून या राज्यांकडे असलेले विज बिल थकबाकी हे एक प्रमुख कारण त्यामागे आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्याला मिळाले एकरी 2 कोटी 80 लाख, रोडच्या भूसंपादनासाठी मोठी रक्कम अदा..

 काय आहे नेमके प्रकरण?

 मागील विज बिलांचा भरणा न केल्यामुळे पावर सिस्टम ऑपरेशन कॉपोरेशन लिमिटेडने देशातील तेरा राज्यांमध्ये असलेल्या ज्या काही वीज वितरण कंपन्या आहेत त्यांना पावर एक्सचेंज विकण्यास नकार दिला असून यामुळे या राज्यांमध्ये वीज खरेदी करणे आता शक्य होणार नाही. त्यामुळे जर विजेची मागणी वाढली तर संबंधित राज्यांमध्ये वीज कपात वाढेल.

नक्की वाचा:Fish Farming: मत्स्यशेती घेईल आता उंच भरारी, देशात 'निलक्रांती' आणण्याच्या अभियानाला मंजुरी

कोणती आहेत ती तेरा राज्य?

यामध्ये मध्य प्रदेश,महाराष्ट्र,कर्नाटक,छत्तीसगड, तामिळनाडू, तेलंगणा, मिझोराम, मनिपुर, बिहार, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये असलेल्या वीज वितरण कंपन्यांना पावर एक्सचेंज मधून वीज खरेदी करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे या राज्यांना स्वतःच्या राज्यांमधील उत्पादना शिवाय पर्याय नाही.

म्हणून या राज्यांमध्ये जर विजेची मागणी वाढली किंवा वीज उत्पादनात घट झाली तर वीज पुरवठा खंडित होणार आहे.आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यांनी पावर एक्सचेंजवर वीज खरेदीवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नक्की वाचा:Machinary Subsidy: शेतकरी बंधूंनो!'ही'योजना देते शेतीत यांत्रिकीकरणासाठी अनुदान,वाचा संपूर्ण तपशील

English Summary: in thirteen state in country can shut electricity supply due to some reason
Published on: 19 August 2022, 01:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)