राज्यात केळीला प्रति टन १० ते १५ हजार रुपये भाव मिळत आहे. जे की मागील दोन महिन्यात भाव वाढले नसून सध्या नवरात्रमुळे महिला महिन्यापासून प्रति टनामागे २ ते ३ हजार रुपयांची वाढ झालेले आहे. मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी असल्यामुळे हे भाव असेच राहतील अशी शक्यता आहे. राज्यात केळीला चांगला भाव मिळत नसेल तरी सध्या पुरवठ्याच्या दृष्टिकोनातुन कमी केळी असल्याने भाव स्थिर राहिलेला आहे. मागील सहा महिन्यांपासून केळीच्या दरात चढ उतार होत होता. तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने केळीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण केली.
गणेशोत्सवानंतर वाढ :-
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची केळी बाबत वाढती मागती पाहता केळीच्या दरात पुन्हा सुधारणा झाली. राज्यात सध्या केळीचा सरासरी भाव १२ ते १३ हजार रुपये वर गेलेला आहे. नवरात्र च्या सनामुळे केळी चे दर मोठ्या प्रमाणात वाढतील जे की प्रति टन १८ ते २१ हजार रुपये कडे जातील अशी अपेक्षा आहे मात्र ती अपेक्षा पूर्ण होताना काही दिसत नसल्याचे चित्र पाहायला भेटत आहे. जे की नवरात्र चालू होऊन चार दिवस झाले तरी अजून केळी चा प्रति टन दर हा १० ते १५ हजार रुपये च आहे.
हेही वाचा:-जाणून घ्या, करडई लागवडीचे तंत्र आणि व्यवस्थापन, वाचा सविस्तर.
मागणी कायम राहण्याची शक्यता :-
सध्या सर्व सण चालू झाले असून केळीला पुढील एक दोन महिने मोठ्या प्रमाणावर मागणी राहील अशी शक्यता वर्तवली आहे. जे की केळीचे दर देखील खाली येणार नाहीत अशी अपेक्षा व्यापारी वर्ग करत आहे. तसेच बागायतदार सांगतात की अगदी कमी प्रमाणात दर भेटण्यापेक्षा सध्याचे दर समाधानकारक आहेत. मागील काही दिवसांपूर्वी केळीचे प्रति टन दर हंस २० ते २१ हजार रुपये वर पोहचले होते.
केळीचा तुटवडा :-
ज्यावेळी दर मोठ्या प्रमाणावर सुरू होते त्यावेळी केळीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर तुटवडा होता. तर सध्या जळगाव व काही भागात केळीची उपलब्धता कमी असल्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. खानदेश, सोलापूर च्या तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्ये केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे असे स्थानिक भागातील बागायतदार सांगतात तसेच केळीची उपलब्धता खूप कमी प्रमाणात आहे असे देखील सांगितले जाते.
Published on: 30 September 2022, 05:08 IST