News

नववर्षाच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. रब्बी हंगामातील पिके ऐन वाढीच्या अवस्थेत असताना आलेला हा अवकाळी पाऊस रब्बी पिकांसाठी काळ बनून बरसला होता. यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पावसानंतर राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण व दाट धुक्याची चादर नजरेस पडत होती, त्यामुळे देखील पिकांची मोठी क्षती होत होती.

Updated on 22 January, 2022 10:14 PM IST

नववर्षाच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. रब्बी हंगामातील पिके ऐन वाढीच्या अवस्थेत असताना आलेला हा अवकाळी पाऊस रब्बी पिकांसाठी काळ बनून बरसला होता. यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पावसानंतर राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण व दाट धुक्याची चादर नजरेस पडत होती, त्यामुळे देखील पिकांची मोठी क्षती होत होती.

मध्यंतरी अवकाळी पावसाने थोडी उघडीप दिली त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला होता, मात्र पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने राज्यातील पश्चिम भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या मनात विचारांचे काहूर माजले आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, अरबी समुद्रात येत्या 24 तासात तुफानी वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे अरबी समुद्र लगत असलेल्या कोकण विभागात तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सऱ्या बरसण्याची दाट शक्यता आहे. खानदेशात देखील अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळी वाऱ्याचा प्रभाव पडणार असून या भागात देखील वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.

आज मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे नाशिक अहमदनगर तसेच खानदेशातील धुळे जळगाव नंदुरबार कोकणाच्या पालघर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. तसेच काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सऱ्या देखील कोसळल्याचे सांगितले जात आहे. तसेच येत्या 24 तासात उत्तर तसेच मध्य आणि पश्चिम अरबी समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने याचा फटका गुजरात किनारपट्टीला बसणार आहे.

उद्या कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उद्या राज्यात सर्वत्र किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात सर्वत्र थंडीचा जोर हा कायम राहणार आहे.

English Summary: In the next 24 hours, a storm is expected in the Arabian Sea
Published on: 22 January 2022, 10:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)