News

सोमवार दि. १ ऑगस्ट रोजी माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे

Updated on 02 August, 2022 7:07 PM IST

सोमवार दि. १ ऑगस्ट रोजी माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी देऊळगाव राजा येथे श्री गजभिये डीएफओ बुलडाणा ,श्री दुबे आरएफओ देऊळगाव राजा व श्री सावळे आरएफओ मेहकर ,श्री अहीरे एसडीओ सिंदखेड राजा,तसेच रोहींच्या उपद्रवाबाबत मागील दोन वर्षापासुन विविध स्थरावर

सतत पाठपुरावा करणारे माजी तलाठी/पीएसआय प्रमोद घोंगेपाटील, रा.कॉ. तालुका अध्यक्ष उद्धवराव म्हस्के, शेतकरी प्रतीनिधी शिवहरी बुरकुल,गणेश मुंढे, दिपक पवार ,रमेश दंदाले, विकास गवई यांचे उपस्थितीत दीड तास मॅरेथॉन बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना रोहींबाबत दोन स्थरांमध्ये उपाययोजनाMeasures in two stages regarding Rohini to all officers

करण्याबाबत सुचना केल्या .तसेच मंत्रालयीन स्थरावर आपण याबाबत कायम उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करू असे शेतकरी प्रतिनिधींना सांगीतले .यामध्ये 1) तात्काळ करता येणाऱ्या उपाययोजना .2) रोहीबाबत कायम स्वरूपी उपाययोजना .अशा सूचना करण्यात आल्या.तात्काळ करता येणाऱ्या गोष्टींमध्ये डॉ. शिंगणे

यांनी सर्व अधिकार्यांना शेतकर्‍यांकडून नुकसानी बाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे तात्काळ वनरक्षक, तलाठी, कृषीसहाय्यक यांच्या संयुक्त समीतीने पंचनामे करून संबंधीत शेतकर्यांना एक ते पंचविस हजार पर्यंत मदत देण्याची कार्यवाही करावी, यासाठी आपण वाढीव निधी उपलब्ध करून देऊ असे सांगीतले.शेतकऱ्यांना तक्रार अर्ज करणे सोयीचे व्हावे

यासाठी तहसिल कार्यालयात वन्य प्राणीग्रस्त शेतकरी मदत कक्ष स्थापन करून तक्रारअर्ज स्विकारावेत व वनविभागाकडे पाठवावेत.दिर्घकालीन उपाय योजनांमध्ये वनक्षेत्रालगत नाली व त्यावर कुंपण करण्यासाठी निधी उपलब्ध करणे, नर रोहींची नसबंदी करणे, रोहींना उपद्रवी प्राणी घोषीत करणे. यासाठी आपण मंत्रालयीन स्थरावर पाठपुरावा करू असे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगीतले .

English Summary: In the meeting regarding Rohi nuisance, Dr. Rajendra Shingane gave instructions to the officials to plan a solution on two levels.
Published on: 02 August 2022, 07:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)