News

हंगामात खरिपातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले होते अतिवृष्टीने त्राहिमाम् माजवला असल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते पावसामुळे खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले मात्र याला नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे उसाच पिक अपवाद ठरले. अतिरिक्त पावसामुळे उसाच्या पिकाला कुठलाच धोका बसला नाही याउलट जिरायती क्षेत्रात लावलेला ऊस देखील मोठ्या जोमात वाढला. बागायती क्षेत्रात लावलेला उस यावर्षी दर्जेदार उत्पादन देऊन गेला तर जिरायती क्षेत्रात लावलेल्या उसापासून देखील समाधानकारक उत्पादन मिळाल्याचे सांगितले जात आहे.

Updated on 08 February, 2022 4:28 PM IST

या हंगामासाठी 15 ऑक्टोबर रोजी उसाचे गाळप सुरु झाले. म्हणजे हंगाम सुरू होऊन जवळपास चार महिने उलटले आहेत. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड बघायला मिळते सध्या पश्चिम महाराष्ट्रातील ऊस तोडणी अंतिम चरणात आहे आणि आगामी काही दिवसात पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण उसाची तोडणी आटपले जाईल आणि ऊस गाळप हंगाम लवकरच शटडाऊन होईल. मराठवाड्यातील काही भाग सोडता अनेक भागात ऊस गाळप अंतिम टप्प्यात आहे. याबाबत साखर आयुक्त कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या चार महिन्यात 197 साखर कारखान्यात ऊस गाळप केली गेली.

या 197 साखर कारखान्यास सुमारे 750 लाख टन ऊस गाळप करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ऊस गाळप मधून सुमारे 755 लाख क्‍विंटल साखरेचे उत्पादन पदरी पडले. यंदा अपेक्षेसारखा हंगाम गेला असल्याचे आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. उसाच्या लागवडी वरून ऊस गाळप हंगाम किती कालावधी पर्यंत सुरू राहील हे ठरवले जाते. हाती आलेल्या माहितीनुसार, 31 मार्चपर्यंत राज्यातील जवळपास शंभर साखर कारखान्यातील ऊस गाळप बंद होणार आहे. तसेच 30 एप्रिल पर्यंत 80 साखर कारखाने ऊस गाळपचा बिगुल थांबणार आहेत. मात्र उर्वरित साखर कारखाने 20 मेपर्यंत आपले गाळप हंगाम सुरू ठेवणार असल्याचे सांगितले गेले आहे. 

त्या त्या विभागात किती ऊस शिल्लक राहिला आहे यानुसार ऊस गाळप कालावधी ठरत असतो. या हंगामात अवकाळी मध्ये थोडा काळ ऊस गाळप रखडली होती मात्र तेवढा वेळ सोडला तर संपूर्ण हंगामभर ऊस गाळपाचा धुराडा कायम होता. मराठवाड्यात अद्याप तोडणी सुरू असल्याने येथील ऊस गाळप हंगाम उशिरा शट डाऊन होईल.

English Summary: In the final stages of the sugarcane crushing season; Sugarcane mills in the state will be closed on this day
Published on: 08 February 2022, 04:28 IST