आपल्या देशात पूर्णपणे 98 टक्के लोक हे शेतकरी आहेत. त्यामुळं शेती आणि शेती संलग्न असलेले व्यवसाय करून शेतकरी आपली उपजीविका करत असतो. शेती करायचे म्हटले की मशागत आली, वेगवेगळ्या प्रकारची खते ही शेतीसाठी खूप आवश्यक असतात.शेतीतून जर भरघोस उत्पन्न काढायचे असेल तर खते आणि रासायनिक खते याशिवाय पर्याय नाही. जर का पिकाला योग्य वेळी खते दिली तर पिकातून आपण भरघोस उत्पन्न मिळवू शकतो. म्हणूनच शेतीला खताशिवाय अजिबात पर्याय नाही.
रब्बी हंगामाची सुरवात झाली:
वाढत्या महागाई मुळे सर्वांचे भाव वाढले आहेत त्यामुळे खतांचे सुद्धा भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यंदा च्या वर्षी खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे.उत्पन्न कमी मिळाल्यामुळे शेतकरी सुद्धा अडचणीत आला आहे. रब्बी हंगामाची सुरवात झाली असून बरोबर हंगामाच्या सुरवातीला च रासायनिक खतांचा भाव हा वाढलेला आहे त्यामुळं या वाढत्या महागाई मुळे शेतकरी राजा त्रस्त झाला आहे.
रब्बी हंगामात 18:46 या रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. परंतु कच्च्या मालाच्या भाव वाढीमुळे रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झालेली आहे. परंतु ज्या दुकानदाराकडे पूर्वी चा खतांचा साठा आहे त्यांनी ती रासायनिक खते पूर्वीच्या दरात विकावी अश्या सूचना सुद्धा केल्या आहेत.शेतीतून जर भरघोस उत्पन्न काढायचे असेल तर खते आणि रासायनिक खते याशिवाय पर्याय नाही
महागाई मुळे 18:46 च्या बदल्यात ही खते वापरावीत:-
वाढत्या महागाई मुळे शेतकरी टत्रस्त झालेला आहे. 18:46 या खताचा वापर मोठ्या प्रमाणात होतो परंतु वाढत्या किमती मुळे या बदल्यात आपण 10:26:26, 12:32:16, 15:15, 20:20:00 यांचा सुद्धा वापर करू शकतो. या रासायनिक खतांचा वापर करून सुद्धा आपण शेतीमधून भरघोस उत्पन्न मिळवू शकतो.
Published on: 03 November 2021, 09:04 IST