बर्ड फ्लू हा आजार पोल्ट्री व्यवसायाचा कर्दनकाळ असा आजार आहे. महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूनेशिरकाव केलेला आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक कोंबड्यांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू झालेला आहे.
या मृतपक्ष्यांचे नमुने परीक्षणासाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून या पक्षांचा मृत्यू हा H1N1इन्फ्लूएंजामुळे झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न झाले आहे. ज्या पोल्ट्री फार्म मध्ये या कोंबड्या मृत झाल्या त्या पोल्ट्री फार्म च्या परिसरातील जवळपास 25 हजार कोंबड्या मारण्याचे आदेश स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. चिकन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्स वरही या याचा परिणाम पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्याच्या पशु विभागाला संक्रमण नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले आहेत
त्या सोबतच मृतपक्षांचे नमुने परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. या बाबतीत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब डांगडे यांनी सांगितले की शहापूर तालुक्यातील वेहोली या गावात जवळपास शंभर कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. पुण्याच्या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार या पक्षांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याने निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये नजिकच्या परिसरातील 25 हजार कोंबड्या मारण्यात येतील असेही सीईओ यांनी स्पष्ट केले. याचा परिणाम शेअर मार्केटवर होऊन पोल्ट्री उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपनी वेंकीज इंडिया या कंपनीचे शेअर चार टक्क्यांनी घसरल्या चे समोर आले आहे. गुरुवारी या शेअरची किंमत 2156 इतकी होती तर ती घसरून 2073 रुपये इतकी झाली.
Published on: 18 February 2022, 05:01 IST