कापूस हे खरीप हंगामातील एक प्रमुख पीक असून महाराष्ट्रातील विदर्भ आणि खानदेश पट्ट्यात या प्रमाणात कापूस लागवड केली जाते. आपल्याला माहित आहेच की मागच्या वर्षी कापसाला कधी नव्हे एवढा उच्चांकी दर मिळाला. कारण मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या अतोनात नुकसान झाल्याने उत्पादनात प्रचंड घट आली होती. नेमकी अशीच काहीशी परिस्थिती या वर्षी देखील आहे.
तसे पाहायला गेले तर या वर्षी कापूस लागवड क्षेत्रात वाढ होईल असा एक अंदाज होता व त्या पद्धतीने वाढ झाली सुद्धा. परंतु यावर्षी देखील महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे कापूस पिकाचे बऱ्याच ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे.
या सगळ्या परिस्थितीत आता नवीन कापूस काही ठिकाणी बाजारपेठेत विक्रीसाठी येऊ लागला असून पंजाब व हरियाणा या ठिकाणी देखील नवीन कापसाला 12000 हजार तर गुजरात मध्ये देखील नवीन कापसाला अकरा ते बारा हजार पर्यंत भाव मिळाला. एवढेच नाही तर जागतिक स्तरावर देखील कापसाला मागणी वाढली असल्यामुळे कापसाला चांगला भाव राहील असा एक अंदाज आहे.
तसेच अमेरिकेत दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे तेथे देखील कापूस उत्पादनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. या व सगळ्या परिस्थितीचा कापूस उत्पादनावर विपरीत परिणाम होईल व या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा कापसाचे दर वाढण्यात होईल असा एक अंदाज आणि चर्चा व्यापाऱ्यांमध्ये आहे.
नक्की वाचा:बांबू लागवड एक हिरवं सोनच, जाणून घ्या लागवड आणि फायदे
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना या दिवसात जी काही आर्थिक गरज असते त्या गरजेच्या माध्यमातून नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल या दराने खेडा खरेदीच्या माध्यमातून कापसाचे बुकिंग आगाऊच केले जात आहे.अपेक्षित किंमत गृहीत धरून कापसाचा सौदा केला जातो. तसे पाहायला गेले तर बऱ्याच ठिकाणी असे व्यवहार होतात.
कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी लागणारी पैशाची गरज भागवण्यासाठी शेतकरी असा व्यवहार करतात. महाराष्ट्रातील प्रमुख कापूस उत्पादक पट्टा असलेल्या विदर्भातील कळंब तालुका किंवा इतर भागांमध्ये असले व्यवहार केले जात आहेत. परंतु शेतकरी बंधूंसाठी असले सौदे फायद्याच्या आहेत की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे.
नक्की वाचा:पंजाबराव डख यांचा पावसाबाबत अंदाज, सप्टेंबरमध्ये ‘या’ ठिकाणी होणार अतिवृष्टी
Published on: 13 September 2022, 10:42 IST