News

जर सध्या आपण भाजीपाला दराचा विचार केला तर सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडवण्याचे काम भाजीपाला करत असून सर्वच भाजीपाल्याचे दर उच्चांकी पातळीवर गेले आहेत. जर या दरवाढीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच परतीच्या पावसाने जो काही धुमाकूळ घातला त्यामुळे बरेच भाजीपाला पीक ऐन काढणीच्या वेळेत पावसात सापडल्यामुळे प्रचंड प्रमाणात खराब झाले.

Updated on 03 November, 2022 8:02 AM IST

 जर सध्या आपण भाजीपाला दराचा विचार केला तर सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडवण्याचे काम भाजीपाला करत असून सर्वच भाजीपाल्याचे दर उच्चांकी पातळीवर गेले आहेत. जर या दरवाढीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच परतीच्या पावसाने जो काही धुमाकूळ घातला  त्यामुळे बरेच भाजीपाला पीक ऐन काढणीच्या वेळेत पावसात सापडल्यामुळे प्रचंड प्रमाणात खराब झाले.

नक्की वाचा:ठिबक सिंचनद्वारे पिकांना खते दिल्यास उत्पादनात होईल वाढ; जाणून घ्या प्रक्रिया

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या पावसामधून जो काही भाजीपाला शिल्लक राहिला त्याला दिवाळीच्या कालावधीमध्ये काढणीचे काम रखडल्यामुळे देखील भाजीपाल्याच्या पुरवठावर परिणाम झाला. जर आपण सध्या परिस्थितीचा विचार केला तर व्यापारी थेट बांधावर जाऊन कोथिंबीर खरेदी करत असून काही ठिकाणी कोथिंबिरीला शेकडा चार हजार रुपयांपर्यंत बाजार भाव मिळत आहे.

मागणीच्या मानाने कोथिंबिरीची प्रचंड कमतरता बाजारपेठांमध्ये जाणवत असून त्यामुळेच बाजारभावात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होताना दिसून येत आहे. कोथिंबीर आणि मेथी ही दोन पिके कमी कालावधी येत असल्यामुळे शेतकरी दोन पिकांच्या मधला टाइमिंग किंवा एखाद्या पिक लागवडीला वेळ असेल तर वरच्यावर मेथीची आणि  कोथिंबिरीची लागवड करतात.

नक्की वाचा:ऊस दरावरून शेतकरी आक्रमक, आंदोलकांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडून केलं आंदोलन

परंतु या पालेभाज्यांना ऑक्टोबर मध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून बऱ्याच शेतकऱ्यांचे कोथिंबीर आणि मेथी या पावसात खराब झाली. परंतु ज्या शेतकऱ्यांचे हे पीक पावसामध्ये वाचले.

अशा पिकांना आता बाजारपेठेत चांगला भाव मिळत असून थेट बांधावर जाऊन व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागल्याने मेथी आणि कोथिंबीरचा बाजार भाव मध्ये वाढ झालेली आहे. जर आपण मेथीचा विचार केला तर मेथीला देखील अडीच ते तीन हजार रुपये शेकडापर्यंत बाजार भाव मिळत आहे.

नक्की वाचा:मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

English Summary: in some market get high rate to corriender and fenugreek vegetable
Published on: 03 November 2022, 08:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)