राज्यातील बहुतांश शेतकरी कांदा पिकाची लागवड करत असतात, त्यामुळेच महाराष्ट्र राज्य भारतातील प्रमुख कांदा उत्पादक राज्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र कांदा लागवडीसाठी विशेष ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा कांद्याचे आगार म्हणून जगात विख्यात आहे.
जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजार पेठ म्हणजेच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात आहे. मात्र असे असले तरी या वेळी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने 486 कोटी रुपयांची कांद्याची उलाढाल करून एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील यावेळी धोबीपछाड दिली आहे. शेतकरी मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीमध्ये चक्क 486 कोटी 83 लाख 84 हजार रुपयांची रेकॉर्डतोड कांदा उलाढाल झाली आहे.
महाराष्ट्रातील वाशी, पुणे, नाशिक पाठोपाठ सोलापूर बाजार समिती सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. भारतातील अग्रगण्य बाजारपेठांमध्ये सोलापूर बाजार समितीचा नंबर लागतो. यावर्षी सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक नमूद करण्यात आले आहे. शनिवारी सोलापूर बाजार समिती मध्ये जळगाव लासलगाव नासिक सांगली सातारा पुणे अहमदनगर बीड उस्मानाबाद लातूर इत्यादी जिल्ह्यांमधून 50 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली, आणि यातून तब्बल आठ कोटी रुपयांचीउलाढाल झाल्याचे समोर आले आहे. सोलापूर बाजार समितीत शनिवारी 501 ट्रकांनी हजेरी लावली होती. सोलापूर बाजार समितीत रेकॉर्ड तोड आवक नजरेस आली असली तरी बाजार समितीमध्ये कांद्याचे दर स्थिर राहिले होते.
शनिवारी 100 रुपये तर 3000 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल कांद्याला दर प्राप्त झाला होता. याच दिवशी लासलगाव मध्ये 14 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. म्हणजे सोलापूर बाजार समितीने आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी लासलगाव बाजारपेठला मागे सारत एक नवीन विक्रम आपल्या नावे केला आहे.
Published on: 16 January 2022, 11:43 IST