News

सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच कांद्याच्या विक्रमी आवक झाली. एकाच दिवसात कांद्याची एक लाख क्विंटलच्यापुढे आवक होणारी सोलापूर ही राज्यातील पहिली बाजार ठरले आहे.

Updated on 11 January, 2022 5:27 PM IST

सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच कांद्याच्या विक्रमी आवक झाली. एकाच दिवसात कांद्याची एक लाख क्विंटलच्यापुढे आवक होणारी सोलापूर ही राज्यातील पहिली बाजार ठरले आहे.

समोरचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव मध्ये असलेल्या 2 बाजार समित्यांमध्ये 51 हजार क्विंटल,, नाशिक बाजार समितीत 3200, पुणे बाजार समितीत 15900 क्विंटल  कांद्याची आवक झाली. जर एकाच दिवशी कांद्याची विक्रमी आवक होण्याचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत लासलगाव बाजार समितीमध्ये 45 हजार क्विंटल आवक झाली असून आज क्रम सोलापूर बाजार समितीने मोडीत काढला.

 सोलापूर बाजार समितीत एकाच दिवशी दुपटीपेक्षा अधिक आवक झाली.

 यामागील प्रमुख कारण म्हणजे श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त बुधवारपासून तीन दिवस बाजार व्यवहार बंद असणार आहे त्यामुळे कांद्याची विक्रमी आवक होत आहे.सात जानेवारीला 615 ट्रक, आठ जानेवारीला 717 ट्रक आणि सोमवारी तब्बल 1 हजार 54 ट्रक कांद्याची विक्रमी आवक झाली. 

सोमवारी राज्यातील बऱ्याच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक चांगली झाली. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत बावीस हजार दोनशे पन्नास, नाशिक बाजार समितीत 3200,पुणे बाजार समितीमध्ये 15900, लासलगाव बाजार समिती 51000 तर मुंबई बाजार समिती 14 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

English Summary: in solapur market comitee recorbreak inccoming to onion
Published on: 11 January 2022, 05:27 IST